
कोल्हापूर: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या सुपर- स्पेशॅलिटी केयर हॉस्पिटलने आज कोल्हापूरमध्ये तेथील खासगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने पाच जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञांनी १६ महिन्यांच्या कालावधीत या शस्त्रक्रिया केल्या. कोल्हापूर येथील पाच रूग्णांवर करण्यात आलेल्या या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी कोल्हापूरमधील अंतरंग जीआय हॉस्पिटल आणि अॅपल सरस्वती हॉस्पिटल या आघाडीच्या हॉस्पिटल्सचे सहकार्य मिळाले.तीन रुग्णांवर जिवंत अवयव प्रत्यारोपण करण्यात आले, तर दोघांची मृत्यूपश्चात अवयवदानातून यकृत प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्यात आली होती. अखेर जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध असल्याचे कळवण्यात आले.डॉ. विक्रम राउत, सल्लागार, यकृत आणि एचपीबी सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, ‘कोल्हापूरमधील रूग्णांसाठी आम्ही आमच्या तज्ज्ञ अनुभवाचा लाभ करून देऊ शकलो याचा आनंद वाटतो. या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शव आणि जिवंत दात्यांच्या प्रत्यारोपणाविषयी असलेल्या सरकारी नियमांनुसार करण्यात आल्या. यापैकी एक केस आव्हानात्मक होती, कारण त्यामध्ये दाता आणि रूग्णाचा रक्तगट जुळत नव्हता. तरीही आम्ही प्रत्यारोपण पूर्व उपचारांनंतर एबीओ- इन्कम्पॅटिबल यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सर्व रूग्णांची तब्येत सुधारली असून ते आता पूर्ववत जीवन जगत आहेत.’डॉ. अशोक भूपाली, सीएमडी, अॅपल सरस्वती हॉस्पिटल म्हणाले, ‘या भागात अत्याधुनिक आरोग्य सेवा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटलशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे कोल्हापूरमधील नागरिकांना तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची तसेच उपचारांनंतर मागोवा घेण्याची सोय उपलब्ध होईल.’रूग्णांपैकी एक राजनंदिनी यांना वयाच्या फक्त पाचव्या महिन्यात बिलीटरी अट्रेशिया हा आजार झाला होता. त्यांचे यकृत इतक्या वर्षांत अतिशय खराब झाले होते व अखेर त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. आपल्या आईकडून त्यांना यकृत मिळाले व राजनंदिनी यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर चारच महिन्यांत त्या पूर्वीसारखे आयुष्य जगायला लागल्या.आणखी एक रूग्ण हेमंत मयेकर हे बराच काळ प्रत्यारोपणासाठी यकृत मिळण्याच्या प्रतीक्षा यादीत होते. ते म्हणाले, ‘शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण टीम अतिशय मदत करणारी आणि पाठिंबा देणारी होती. मी बराच काळ प्रतीक्षा यादीवर होतो आणि अखेर अपोलो हॉस्पिटलने नांदेडमधून यकृत आणण्याची जबाबदारी घेतली. त्यांनीच माझ्या प्रत्यारोपणासाठी सर्व व्यवस्था केली. आज मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि हॉस्पिटलने केलेल्या मदतीसाठी त्यांचा आभारी आहे.’ डॉ. आदित्य कुलकर्णी, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी. अंतरंग जीआय हॉस्पिटल म्हणाले, ‘आम्ही अपोलो नवी मुंबईचे त्यांनी केलेले सहकार्य व तज्ज्ञ सल्ल्यासाठी आभारी आहोत. अपोलोच्या अवयव प्रत्यारोपण टीमने आम्हाला रूग्णाचे यकृत प्रत्यारोपणानंतर पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत चांगली मदत केली. आम्ही बराच काळ या रूग्णाच्या संपर्कात होतो आणि दुर्देवाने त्यांच्या यकृताचा आजार शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे यकृत खूप खराब झाले होते. आम्ही त्यांना अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईबरोबर काम केल्यामुळे आम्ही त्यांना दुसरे जीवनदान देऊ शकलो.’
Leave a Reply