
कोल्हापूर: आपल्या पारंपरिक व्यवसायात वृद्धी करावयाची असेल तर व्यवसायासंबंधी आयोजित प्रदर्शनामध्ये सहभागी होणे जरुरी असल्याचे मत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यक्त केले.यूबीएमच्या वतीने मुंबई येथे हॉटेल सहारा स्टारमध्ये 21 ते 23 डिसेंबर असे तीनदिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी येथील हॉटेल सयाजीमध्ये रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी श्री. ओसवाल बोलत होते.ते म्हणाले, विविध शहरांमध्ये आयोजित अशा प्रदर्शनांमध्ये आपण सहभागी झाल्यानंतरच व्यवसायामध्ये आज काय चालले आहे, नवीन तंत्रज्ञान काय आले आहे, याची परिपूर्ण माहिती मिळू शकेल.दरम्यान, यूबीएमच्या मुर्तूझा धनकोटने यूबीएमविषयी माहिती देऊन प्रदर्शनाची अधिक माहिती देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे उपाध्यक्ष दिनकर ससे, शहर सचिव माणिक जैन, विजय हावळ, संचालक संजय पाटील, गजानन बिल्ले, शिवाजी पाटील, महेश जोके, अनिल पोतदार, नितीन ओसवाल, रवींद्र राठोड, राजू चोपडे, संजय चोडणकर, संजय खद्रे, प्रतापसिंह देसाई, संजय माने, विजयकुमार भोसले, कुमार दळवी, अशोक झाड, सुरेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक उपस्थित होते.कोल्हापुरात लवकरच प्रदर्शन:दरम्यान, कोल्हापूरमध्ये व्यवसायाला जरुरी असणाऱ्या मशीनरी आणि संबंधित घटकांचे प्रदर्शन लवकरच घेणार असल्याची घोषणा श्री. ओसवाल यांनी यावेळी केली, तर यूबीएम या प्रदर्शनाला सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री. धनकोट यांनी दिली.
Leave a Reply