भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सिटी बँक आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) यांच्या सहयोगातून भारतीय शास्त्रीय संगीताच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी (ख्याल / धृपद / तबला / पखवाज) अर्ज मागवले जात आहेत. विजेत्यांना एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत प्रति महिना रुपये ७,५००/- शिष्यवृत्ती देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ncpascholarships@gmail.com या इ मेल आयडीवर किंवा ‘सिटी-एनसीपीए’ संगीत शिष्यवृत्ती (हिंदुस्थानी संगीत), नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस्, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्त्यावर कुरियर द्वारे ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत पाठवावेत. ३१ डिसेंबर, २०१८ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, शिक्षणासंबंधी माहिती, इमेल आयडी, संगीत शिक्षकांचे नाव, संगीत शिक्षणाचा एकूण कालावधी, पारितोषिके, पुरस्कार, इतर शिष्यवृत्ती, कार्यक्रमांच्या सादरीकरणांबद्दल माहिती, इ. तपशील लिहावा. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना इमेल किंवा दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रत्यक्ष सादरीकरणासाठी एनसीपीए, मुंबई येथे यावे लागेल. एनसीपीए समितीचा निर्णय अंतिम असेल.
दूरध्वनी क्रमांक – ०२२-६६२२३८७२ / ३७३७ (सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०.३०ते१.००आणि दुपारी २.००ते ५.३०)
पात्रता आणि इतर नियम –
१. वयाची अट –
ख्याल / तबला / पखवाज – १८ ते ३० (१ मार्च, २०१९ पर्यंत)
धृपद – १८ ते ३५ (१मार्च, २०१९पर्यंत)
२. ज्या विद्यार्थ्यांना एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात अन्य शिष्यवृत्ती किंवा संगीत शिक्षणासाठी अन्य आर्थिक मदत प्राप्त होत असेल, ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
३. व्यावसायिक गायक आणि वादक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रेडियो’अर्थात ‘आकाशवाणी’तर्फे ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली असेल, त्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठीअर्ज करता येणार नाही.
४. केवळ भारतीय नागरिकत्व असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज क रूशकतात.
Leave a Reply