सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँकेतर्फे WhatsApp बँकिंग सेवा’ सादर

 

कोल्हापूर:WhatsApp बँकिंग सेवा पुरविणारी सारस्वत बँक ही भारतातील दुसरी आणि सहकारी बँकांच्या क्षेत्रातली पहिली बँक ठरली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगिकार करून ग्राहकांना कार्यक्षम, प्रभावी सेवा देण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर असते. हाच वारसा पुढे नेत बँक आपल्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे.
फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या WhatsApp या मेसेजिंग व्यासपीठाने नुकतीच ‘WhatsApp फॉर बिझनेस’ ही सेवा सुरु केली आहे. युजर इनिसीएशनला प्रतिसाद म्‍हणून सॉफ्टवेअर इंटरॅक्शनचा उपयोग करत टेक्‍स्‍ट मेसेजेसचे नोटीफीकेशन, बोर्डिंग पासेस, पावत्या, तिकीट, अकाऊंट स्टेटमेंट यांसारख्या गोष्टी ग्राहकांना पाठविल्‍या जातील. ‘WhatsApp बँकिंग सेवा’ या सेवेच्या माध्यमातून सारस्वत बँकेच्या ग्राहकांना एसएमएसच्या ऐवजी WhatsApp नोटीफीकेशन मिळू शकतील.
ग्राहक येथे संवादही साधू शकतील. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळविणे इत्यादी गोष्टी याद्वारे साध्य होतील. मोबाईल बँकिंग नोंदणी, बँकेच्‍या इतर उत्पादनाची माहिती, विनंती/चौकशी, अर्ज/अॅप डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध होतील. बँकेच्‍या उत्पादनाच्या माहिती संदर्भातली सखोल चौकशी, व्याज दर, अर्ज डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी करीत एका क्लिकद्वारे येथून थेट जाण्‍याची सुविधा देखिल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत.यासाठी ९०२९०५९२७१ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ग्राहक ‘WhatsApp बँकिंग सेवा’ यासाठी नोंदणी करू शकतात.
झपाट्याने बदलत असलेल्या जगात ग्राहकांशी थेट संवाद साधणे खूप गरजेचे झाले आहे. कमी वेळात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्मार्ट संदेशवहन अॅपची मदत होते. डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना नवीन, औत्सुक्यपूर्ण आणि वापरण्‍यास सोपी अशी सेवा देऊन डिजिटल क्षमता उंचावण्याचा सारस्वत बँकेचा सतत प्रयत्न सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!