
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रांची अवस्था फार काही चांगली नाही.आज वीज दर वाढ ही गंभीर समस्या उद्योगांसमोर आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन २०१८ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज नूतन महापौर सौ. सरिता मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्योग परिषद व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संतोष मंडलेचा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांसमोर असलेली आव्हाने आणि संधी याबद्दलच अश्या प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले. उद्योजकांना एकत्रित करून व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.
आसपासच्या राज्यांशी औद्योगिक देवाणघेवाण करून महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात अव्वल करण्यात महाराष्ट्र चेंबर चा मोठा हात आहे. नवोदित उद्योजकांना हा चांगला पर्याय आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना नक्कीच होईल असे नूतन महापौर सौ. सरिता मोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरने यावर्षी पहिल्यांदा यात सहभागी होत आहे यामुळे या प्रदर्शनाची व्याप्ती वाढली.आज महाराष्ट्रात ही संस्था मराठी उद्योजकांना उद्योगक्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले. आज शतकपूर्तीकडे ही संस्था वाटचाल करत आहे.या संस्थेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे.असे महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात उद्योगक्षेत्र अग्रेसर आहे.शंभर वर्षांपूर्वी शाहु महाराजांनी उद्योगांची सुरुवात कोल्हापूर येथे केली. हाच वारसा जपत जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्रात होणारे बदल व संशोधन याची माहिती मिळावी म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे असे ललित गांधी म्हणाले.यावेळी प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत,उपाध्यक्ष अनिल लोढा,उमेश दाशरथी,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स संजय शेटे,शुभांगी तिरोडकर, सारस्वत बँकेचे प्रवीण तपरिया, रमेश जैन,अजित बिरवडकर आणि सुजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply