पत्की हॉस्पिटलमध्ये बी .ओ . एच. संशोधन व उपचार कक्ष सुरु; हजारो जोडप्यांना दिलासा

 

 कोल्हापूर : गरोदरपणामध्ये उदभवलेल्या गुंतागुंतीमुळे निरोगी अपत्यास जन्म देण्यामध्ये वारंवार अपयश येणे ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये या समस्येला ” बी. ओ . एच “(बॅड ऑब्स्टेट्रीक हिस्ट्री ) असे म्हणतात. या समस्येने त्रस्त असणाऱ्या अनेक जोडप्यांवर येथील स्त्री रोग , प्रसूती य वंध्यत्व क्षेत्रामध्ये गेली ३२ वर्ष कार्यरत असणाऱ्या पत्की हॉस्पिटल मध्ये यशस्वी उपचार झाले आहेत. आता या समस्येवर सखोल संशोधन व अत्याधीनिक उपचार करण्यासाठी भारतामधील विविध संशोधन केंद्रे व तञ् यांच्या सहकार्याने पत्की हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष सुरु झाला. राष्ट्रीय व आंतरराष्टीय तज्ज्ञांच्या सांघिक मार्गदर्शनाचा लाभ गरजू जोडप्याना उपलब्ध करून देणारा अशा प्रकारचा हा देशस्तरावरील वैशिट्यपूर्ण विभाग या सर्व सामान्यांचा आवाक्यातील असेल व अशा जोडप्याना सदृढ आपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करेल असा विश्वास डॉ. सतीश पत्की यांनी व्यक्त केला. या विशेष कक्षाचे उदघाटन आज करण्यात आले.
सन २०१७ ते २०१८ या वर्षांमध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये ३०,५०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागामध्ये तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६,६८५ नवीन रुग्णांपैकी २४. टक्के रुग्णांमध्ये बी.ओ.एच. हा प्रश्न आदळून आला. या सर्व रुग्णांवर या विशेष ‘ बी. ओ. एच.’ कक्षमध्ये सखोल, संशोधन व उपचार होणार आहे. या कक्षाचा औपचारीक उदघाटन प्रसंगी अत्यन्त क्लिष्ट परिथितीमध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये यापूर्वी यशस्वी उपचार झालेली जोडपी व बालके उपस्थित होती. विशेष म्हणजे हि जोडपी देशातील विविध राज्यातून तसेच शहरी व ग्रामीण दोन्ही भागातून पत्की हॉस्पिटलमध्ये उपचार करून यशस्वी झालेली आहेत. यश प्राप्ती झालेल्या जोडप्यांच्या अनुभव कथनांमुळे निराश झालेल्या बी.ओ. एच. दाम्पत्यांचे मनोधर्य निश्चितपणे वाढेल व उपचारांना त्यांचा साकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास डॉ. सतीश पत्की यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. उज्वला पत्की यांच्यासह तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!