
कोल्हापूर : कोल्हापूर आर्ट फौंडेशन या स्थानिक कलावंताना व्यासपीठ मिळवून देणाया कला संस्थेतर्फे कोल्हापूरात तिसया कला महोत्सवाचे आयोजन दसरा चौकात भव्य कलामंडपात केले आहे. सुमारे शंभर हून अधिक चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृती या कला महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी मांडण्यात येणार आहेत. या कला मंडपात चित्रकार शिल्पकारांचे 100 स्टॉल्स सोबत कला साहित्याचे स्टॉल्स, अस्सल कोल्हापूर खाद्याचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. कलानगरीतील 5000 हून अधिक कलाकृती रु.500 ते रु.25 लाखापर्यंतच्या रक्कमेत विकत घेता येतील. एकूण 5 दिवस चालणाया या कलामहोत्सवात सकाळच्या सत्रात कलावंतांची चित्र-शिल्प प्रात्यक्षिक व सायंकाळच्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवारी सकाळी बालकुमार चित्रकला स्पर्धा व कलामहोत्सवांची क्षणचित्राची छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कला महोत्सवाच्या पूर्व संधेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आढावा भेट घेवून मार्गदर्शन केले. तरी या कला महोत्सवाचा आनंद कलारसिकांना घेवून कलानगरीच्या कलाकृती विकत घेण्याचे आवाहन समन्वयक प्रशांत जाधव व अजय दळवी यांनी केले आहे.
Leave a Reply