अॅक्शनपॅक्ड फाईट ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

 

मराठीत अॅक्शनपॅक्ड म्हणता येतील, असे फारच थोडे चित्रपट आहेत. त्यातही बॉक्सिंगसारख्या खेळावरचा चित्रपट तर एखादाच… आता ही उणीव “फाईट” हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे. नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ असलेला आणि दमदार कथानक असलेला “फाईट” हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फ्युचर एक्स प्रॉडक्शनच्या ललित ओसवाल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांचे असून त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण आहे.एका शेतकऱ्याच्या मुलाची बॉक्सिंग रिंगमधील धडाकेबाज कामगिरी, त्याला पैसा, अभिमान आणि प्रेमाची जोड मिळाल्यावर काय घ़डतं हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झपाटून जाऊन केलेली मेहनत, त्यासाठीचे कष्ट आणि त्या दरम्यान आलेले चढउतार चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. जीत या नवोदित तरुणाची चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून एक अँक्शन पॅक हिरो या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, सायली जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.स्वप्नील महालिंग यांनी चित्रपटाचं कथा, पटकथा, संवादलेखन केलं आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन आणि स्वप्नील गोडबोले यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून, अजय गोगावले गाणं गायलं आहे. त्याशिवाय विकी सक्सेना यांनी रॅप साँग गायलं आहे. प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.  महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!