रत्नागिरीतील सर्टीफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स रोजगार मेळावा यशस्वी

 

रत्नागिरी : बजाज फिनसर्व्हच्या वतीने पहिल्या सीपीबीएफआय (सर्टीफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स) रोजगार मेळावा २०१८ चे आयोजन गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथे १६डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात सीपीबीएफआय ची सहकारी महाविद्यालये, जी. जे. महाविद्यालय, रत्नागिरी, डी.बी.जे कॉलेज, चिपळूण आणि ए. एस. पी कॉलेज, देवरूख येथील १७५हून अधिकमहत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रामुख्याने बँकिंग, फायनान्स, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स उद्योग क्षेत्रे, बजाज फिनसर्व्हच्या सर्व उपकंपन्या जसे की, बजाज फायनान्स, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स आणि बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स अशा ९ कंपन्यांनी, २० प्रकारच्या जॉब्ससाठी उमेदवारांचे  मूल्यांकन केले. एकूण ७३ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स मिळाल्या. काही उमेदवार अनेक जॉब्ससाठीनिवडले गेले होते त्यामुळे ही संख्या १०८ वर पोहचली. ४४ पैकी २६ सीपीबीएफआय विद्यार्थांची निवड वेगवेगळ्या रोलसाठी करण्यात आली.

सीपीबीएफआय हा ४० दिवसांचा सर्वसमावेशक, प्रात्यक्षिक स्वरुपाचा आणि किफायतशीर सर्टीफिकेट प्रोग्राम आहे, ज्याचे उद्दिष्ट्य पदवीधर तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्याचे आहे. पदवी व नोकरी दरम्यान एक दुवा बनण्याचे काम सीपीबीएफआय करत आहे. त्यामध्ये ज्ञान आणि व्यवहार कौशल्ये यांचा उत्तम संगम असून याद्वारे पदवीधरांनारोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बँकिंग ऑपरेशन्स, इन्श्युरन्स मॅनेजमेंट, अॅडव्हान्स बिझनेस कम्युनिकेशन्स आणि कम्प्युटर प्रोफिशीएन्सी असे विषय हे पदवीधारकांना वाढत्या फायनान्स सर्विस इंडस्ट्रीसाठी तयार करणारे आहेत.

“नव्याने पदवी मिळवलेले १५% हून कमी विद्यार्थी हे रोजगारक्षम असल्याचा बीएफएसआय क्षेत्राचा अनुभव आहे. कुटुंबातील  प्रथम पदवीधर आणि छोट्या शहरांतून आलेल्या पदवीधारकांकरिता परिस्थिती अधिक खडतर आहे. सीपीबीएफआय, या आमच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाचेउद्दिष्ट्य या रोजगारक्षमतेच्या आव्हानासोबत मुकाबला करण्याचे आहे. हा ४० दिवसांचा अभ्यासक्रम अतिशय किफायतशीर शुल्कात विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व आर्थिक क्षेत्राचे  समर्पक ज्ञान आत्मसात करण्यात येईल. आर्थिक क्षेत्रात एका यशस्वी करियरकरिता ते सज्ज होतील. सीपीबीएफआय जॉब फेअर सारख्या मंचांमुळे आमचा मानस हा पदवीधारकांना आर्थिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळवून देण्याचा आहे. पहिल्या सीपीबीएफआय जॉब फेअर २०१८मध्ये, सीपीबीएफआय विद्यार्थ्याचा यशस्वी होण्याचा दर इतर पदवीधारकांच्या जवळपास दुप्पट होता (३९% वि. १७%).” असे बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अजय साठे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!