कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या शिक्षण संस्थेची स्थापना सन १९५७ मध्ये करण्यात आली. या कॉलेजमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त केले असून, पुढे हे विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शासकीय, सांस्कृतिक आणि परराष्ट्रीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. या आजी – माजी विद्यार्थ्यांचे संघटन होऊन, कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कॉलेजच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सुमारे ६१ वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य स्नेहमेळावा माजी विद्यार्थी संघ, कोल्हापूर यांच्यावतीने दि. ९ व १० फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या स्नेह मेळाव्यास हजारो माजी विद्यार्थी उपस्थित राहतील, अशी माहिती माजी संघाचे सचिव प्रमोद जगताप यांनी दिली.
या मेळाव्यास कॉलेजच्या स्थापनेपासून आजपर्यंत म्हणजे सुमारे ६१ वर्षातील विद्यार्थ्याचा सहभाग असणार आहे. या दिमाखदार सोहळ्या अंतर्गत कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि सध्या उच्च पदांवर कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच माजी प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर माजी विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने स्नेह मेळाव्याची सुरुवात होणार आहे. रिफ्रेशमेंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे.
तरी दोन दिवसीय या स्नेह मेळाव्यास कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघाने केले आहे.या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. यासाठी www. drkccpsboard.com या वेबसाईटवर तसेच ऑफलाईन नोंदणी सकाळी १० ते ३ पर्यंत कॉलेजमध्ये करण्याची सोय उपलब्ध आहे.तरी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य व्ही.ए. पाटील, हेमंत पाटील, मनीष झंवर, प्रवीण गुहागरकर, रविंद्र खेडेकर, शिवा यादव,अनिल फातले,नरेंद्र काळे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply