

निवडणुका सोप्या राहिल्या नाहीत.एकेक खासदार निवडून आणून एकीकडे भाजपला थोपवणे आणि शरद पवार यांना पंतप्रधान करणे या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आता महाडिक आणि पाटील यांची समजोता एक्स्प्रेस सुसाट वेगाने धावण्याची गरज आहे. आणि तसे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.डी. वाय. पाटील यांनीही शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.मग मुलाने विरोध करू नये असे महाडिक यांनी आशा व्यक्त केली.देशपातळीवर आणि राज्यपातळीवर आघाडी झाल्याने विरोध करू नये. ते सुसंस्कृत आहेत, परिपक्व आहेत.आणि वडिलांच्या इच्छेला तिलांजली देण्याचे काम ते करणार नाहीत.अशी सौम्य शब्दात महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची तयारी खासदारांनी दर्शवली आहे.
Leave a Reply