

स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे… सर्वच क्षेत्रात एक पाऊल पुढे आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातही अभिनेत्री स्वत:च्या मेहनतीवर आणि अभिनय कौशल्याच्या बळावर स्वत:ची ओळख तयार करत आहे. दोन अभिनेत्रींचं फारसं पटत नाही अशी अफवा पण ब-याचदा सिनेसृष्टीत पसरली आहे पण मग तेव्हा काय होत असेल जेव्हा एकाच सिनेमात एकूण 5 अभिनेत्री प्रमुख भूमिका एकत्र साकारत असतात. एकाच सिनेमात पाच अभिनेत्री एकत्र म्हणजे सिनेमाची कथा ही अजून इंटरेस्टिंग बनणार यात शंका नाही. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या फेव्हरेट पाच अभिनेत्री एकाच सिनेमात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत आणि तो सिनेमा म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.
अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सिनेमात संस्कृती बालगुडे (तन्वी), स्मिता शेवाळे (अर्पिता), हेमांगी कवी (प्रियंका), नीथा शेट्टी-साळवी (सायली) आणि राणी अग्रवाल (जिग्ना) या नटखट, ग्लॅमरस, सुंदर, प्रेमळ अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कथेनुसार या अभिनेत्रींनी साकारलेल्या पाचही पात्रांचा स्वभाव एकमेकांपेक्षा जरासा वेगळा आहे. या पाच जणींनी मिळून सिनेमात आणि सिनेमाचे हिरो सिध्दार्थ जाधव (बाब्या) आणि सौरभ गोखले (समीर) यांच्या आयुष्यात काय धमाका केला आहे याचा अंदाज प्रेक्षकांना ट्रेलरमधून आलाच असेल.
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री एकाच सिनेमात पाहण्याचा योग आल्यामुळे खरोखर सर्व लाईन व्यस्त होणार हे नक्की. या पाच अभिनेत्रींसह कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
या पाच अभिनेत्रींची प्रेमळ जादू कशी प्रेमात पाडेल हे लवकरच कळेल कारण ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमा 1 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Leave a Reply