भीमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात १५ कोटींची उलाढाल

 
कोल्हापूर : पूर्वीच्या काळातील शेती व आताची शेती यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे यांत्रिकीकरनाच्या
 माध्यमातून नवनवीन माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे याचबरोबर नवनवीन संशोधन झालेले आहे याचीही माहिती मिळण्याची भीमा कृषी प्रदर्शनात  संधी उपलब्ध  करून दिली आहे असे सांगितले.
    प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिला बचत गटांना त्यांच्या वस्तूंना याठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून दिली गेली आहे बारा कोटीचा रेडा या प्रदर्शनामध्ये आहे एखाद्या रेड्याची  किंमत  इतकी असेल हे पटतच नाही असे सांगितले. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे समाधान मला आहे त्यामुळे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरले असल्याचे पवार यांनी सांगितले.
      यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना खा. धनंजय महाडिक यांनी प्रदर्शनात ५०० हुन अधिक जनावरांचा समावेश आहे  महिला बचत गटांना मोफत स्टॉल याठिकाणी देण्यात आले असून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे .प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते या मधून मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे व शेतकरी या प्रदर्शनाकडे चांगले शिक्षण म्हणून पाहतात असे सांगितले .
         यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भीमा कृषी पशुप्रदर्शन २०१९ बेस्ट ऑफ दि.शो मुऱ्हा रेडा करमविर अर्जुनसिंग यांचा हरियाणातील “मुऱ्हा रेडा” तर पंजाब मधील बुटासिंग सुभाषसिंग यांचा “नीली रवी रेडा ” याना देण्यात आला. चॅम्पियन ऑफ दि शो मन्सूर यासिन मुल्ला यांच्या किशोर मंचुरियन मुल्ला यांचा “खिलार पाडा” यांना देण्यात आला तर तुकाराम निवृत्ती पवार यांचा  खिलार पाडा व  सत्यभामा केरबा शिंदे यांची देवणी वळू यांना पुरस्कार देण्यात आले याचबरोबर भीमा कृषी प्रदर्शनात पीकस्पर्धा पशुस्पर्धा,जनावरे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या  त्यां विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
          शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती मिळणाऱ्या कृषी प्रदर्शनाला नागरिकांसह शेतकऱ्यांनी व  विदयार्थी विद्यर्थिनी यांनी आजच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यास प्रचंड गर्दी केली होती. 
    शेतकऱ्यांना आवश्यक असणारे साहित्य उपयुक्त वस्तू खते ,बी-बियाणे शेती विषयी माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाल्याने कोल्हापूर, महाराष्ट्र ,कर्नाटकव कोकण आणि विविध ठिकाणचे शेतकरी व नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन गेले व शेतीपूरक सर्वच माहिती जाणून घेतली व  साहित्यांची खरेदी व अवजारे,ट्रॅक्टर विविध मशिनरी यांची खरेदी केली.
     चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात हरियाणा  येथून आणलेला  १२ कोटी रुपये किंमत असलेला  “सुलतानी  नावाचा रेडा” व “निलीरावी रेडा” बारामती भागातून आलेला साडेसात फूट लांब पाच फूट महाराष्ट्रातील क्रॉकेज जातीचा “नंदीबैल” व  कोल्हापूरच्या कारागिरांनी  बनविलेले २० फुटी कोल्हापुरी चप्पल हे भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले .हे पाहण्यासाठी नागरिकांसह शेतकरी यांनी अभूतपूर्व गर्दी चारही दिवस याठिकाणी केली होती 
         कृषिप्रधान भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सदैव आघाडीवर राहिला आहे आपल्या भागातील शेतकऱ्यांना नव्या शतकातील कृषी, प्लास्टिक कल्चर, पशुपालन तंत्रज्ञान आधीची जाणीव व्हावी व माहिती व्हावी यासाठी भीमा उद्योग समूहाच्या वतीने खा.धनंजय महाडिक यांनी २५ ते २८ जानेवारी २०१९ या दरम्यान या सर्वात मोठ्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.आज शेवटच्या दिवशी प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकरी ,विदयार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती.  
       चार दिवसात १५ कोटीच्या  आसपास उलाढाल या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली आहे. महिला बचत गटांनाही याचा फायदा मोठा झाला आहे त्यांच्या ठिकाणी ही लाखोंची उलाढाल झाली आहे.
 महिलांना सौ.अरुंधती महाडिक यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून महिला वर्गातून त्यांचे आभार मानले जात गेले.आज याठिकाणी दिवसभर युवाशक्तीचे प्रमुख पृथ्वीराज महाडिक यांनी भेट दिली होती सौ.अरुंधती महाडिक यांनीही सर्व स्टॉलवर भेट दिली.प्रदर्शनाला चार दिवसात ५ लाखाच्या  आसपास  शेतकरी,नागरिक व शालेय विदयार्थी यांनी भेट दिली 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!