
नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या नेक्स्ट जनरेशन “न्यू कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल” चे लॉन्च केले. टोयोटाच्या नवीन ग्लोबल आर्किटेक्चरने प्रेरित असलेली लक्झरी आणि पावरफुल अशी कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल किंवा सेल्फ चार्जिंग इलेकट्रीक व्हेईकल उत्कृष्ट हँडलिंगसह सहज प्रवास अनुभव व अद्वितीय इंजिनियरिंग, ग्रीन सोल्यूशन्स, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि डिझाइनसह सर्वोत्तम कार्यप्रदर्शन देखील प्रदान करते.नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल २.५ लिटरच्या ४-सिलेंडर गॅसोलीन हायब्रिड डायनॅमिक फोर्स इंजिनद्वारे चालविली जाते जी अधिकतम १३१ किलोवॅट (१७८ पीएस)@५,७०० आरपीएम आउटपुट आणि जास्तीत जास्त २२१ एनएम (२३ किलो मीटर)@३,६००-५,२०० आरपीएम टॉर्क देते. याची हायब्रिड सिस्टिम मोटर जनरेटर कमाल ८८ किलोवॅट (१२० पीएस) आउटपुट आणि जास्तीत जास्त २०४.१ एनएम (२१ किलो मीटर) टॉर्क प्रदान करते. या नवीन सिडानचे स्लिक आणि आधुनिक डिझाईन व्हेईकलला बोल्ड आणि आकर्षक बनविते. कॅमरीची परंपरा कायम राखून नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल किंवा सेल्फ-चार्जिंग व्हेईकलमध्ये आरामदायक रियरसीट, चांगले कार्यप्रदर्शन, डिझाईन आणि लक्झरी सारखे वैशिष्ट्ये राखल्या गेले आहेत. या वैशिष्ट्यांसह हि व्हेईकल सोयीस्कर प्रवासाचा एक चांगला अनुभव प्रदान करते.या प्रक्षेपणानंतर बोलताना, कॅमरी,टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे चीफ इंजिनियर, श्री मसातो कत्सुमता म्हणाले, “नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हील कार ऑटोमोटिव्हला नवीन परिभाषा देते . आम्हाला अशाच सेडानची निर्मिती करायची होती, जी व्यावहारिक, ट्रस्ट आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीने ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करेल आणि याच द्रुष्टीकोनासोबत ‘अनपेक्षित बदल‘ या संकल्पनेची रचना केल्या गेली आहे. आमच्या इंजिनियरिंग टीम ने एकदम नवीन, अग्रोसिव्ह आणि परिष्कृत लूक दिले आहे.”नवीन कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच सोबत आम्ही बेजोड़ परफॉर्मन्स, इंधन कार्यक्षमता, कमी उत्सर्जन यांचे सर्वोत्तम संयोजन घेऊन आणले, जे टोयोटाच्या नवीन ग्लोबल आर्किटेक्चरसह आरामदायक,मनोरंजक आणि मजेदार प्रवासाचा अनुभव प्रदान करेल.लॉन्चच्या प्रसंगी, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक श्री मसाकाजू योशिमुरा म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये, आम्ही येत्या उद्यासाठी वाहतुकीचे ग्रीन सोल्युशन्स सादर करण्यास बांधील आहोत. जगभरात आम्ही हायब्रीड टेक्नॉलॉजीमध्ये अग्रगण्य राहिलो आहोत आणि आता हब भारतसारख्या बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित करीत आहोत जे ग्रीन आणि स्थायी भविष्य दिशानिर्देश केले आहे. नवीन कॅमरी हायब्रिड व्हेईकलचे लाँच आमच्या बांधिलकीचे पुष्टीकरण करतो. आम्ही भारतातील आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत ज्यांनी आमच्या नवीन आणि आधुनिक मॉडेलमध्ये आत्मविश्वास दर्शविला आहे, जे गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरण अनुकूल देखील आहे. हे स्पष्ट आहे की कॅमरीचे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल नेहमीच चांगले कार बनविण्याच्या आमच्या मोहिमेची पुष्टी करते.”
Leave a Reply