
‘कोल्हापूर:
बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला ‘लकी’ सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. ह्या सिनेमातून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतेय. तर अभिनेता अभय महाजनचा हा पहिला व्यावसायिक सिनेमा आहे.

कोल्हापूरच्या भीमा फेस्टिव्हलमध्ये कोपचा गाण्यावर परफॉर्म करणा-या दिप्ती-अभयच्या परफॉर्मन्सवर टाळ्या-शिट्यांची बरसात झाली. ह्या धमाकेदार परफॉर्मन्सनंतर सिनेमाच्या टीमने कोल्हापूरच्या अंबाबाईचे आशिर्वाद घेतले. आणि मग अभिनेत्री दिप्ती सती, सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव आणि निर्माते सुरज सिंग ह्यांनी कोल्हापूरकरच्या पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेले फिल्ममेकर संजय जाधव आपल्या लकी सिनेमाविषयी म्हणाले, “आजच्या काळातल्या कॉलेज तरूणांची भाषा वापरून हा सिनेमा आम्ही बनवलाय. व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. सिनेमाला युए सर्टिफिकेट मिळालंय. ह्यावरून तुम्हांला लक्षात येईल की कोणतेही अश्लील शब्दप्रयोग आणि कोट्या न करता संपूर्ण कुटूंबाला एकत्र बसून बघता येईल असा सिनेमा निर्माण केलाय.”
एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणाले, ““लकी ही कॉलेज तरूणाांचेी कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त, स्वच्छंद आणि मनमौजी आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामूळे लकीमध्येही तुम्हांला अनेक अपारंपारिक सरप्राइजेस मिळतील. संजयदादा निखळ मनोरंजन देणारे सिनेमे बनवतात. आणि हा त्यांच्याच धाटणीचा धमाल विनोदी चित्रपट आहे. “संजय जाधव ह्यांच्या सिनेमातून मराठीत पदार्पण करणारी अभिनेत्री दिप्ती सती म्हणते, “जिया आजच्या तरूणींचे प्रतिनिधीत्व करते. ती तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव मारणारी आहे. आणि त्याचवेळी हिपहॉप डान्स करणारीही आहे. मॉर्डन असणे म्हणजे स्वैराचारी असणे नाही, असं मानणा-या जियाला आत्मभान आहे.व्हॅलेंटाईन महिन्यात येणारी ही फिल्म आपल्या कॉलेजमध्ये मुलीला प्रपोज करू इच्छिणा-या प्रत्येक वयोगटातल्या मुलाला आपलीशी वाटणारी आहे.”
बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
Leave a Reply