वारणा बझार आणि स्टेफ्रीतर्फे ८ हजार स्त्रियांना स्वच्छतेचे प्रशिक्षण

 

कोल्हापूर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेचे किती महत्त्व आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने वारणा बझारसोबत भागिदारी केली आहे.यावर्षी पारंपरिक हळदी- कुंकू एका वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते,ज्यामध्ये स्त्रियांना स्टेफ्री एक्सेल पॅड्स औसा म्हणून देण्यात आले. ८२ गावांतील ८ हजार स्त्रिया या हळदी- कुंकू समारंभात सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर या समारंभात १० डॉक्टर्सनी सहभागी होत सॅनिटरी पॅड वापरण्याचे फायदे समजावून दिले. त्यांनी सॅनिटरी पॅड्सचा वापर आणि मासिक पाळीसंदर्भातील गैरसमजही दूर केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहा एन कोरे आणि शुभलक्ष्मी व्ही कोरे यांनी शोभाताई व्ही. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. या उपक्रमाद्वारे जॉन्स अँड जॉन्स तसेच वारणा बझारने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!