मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘हॉस्पिकॉन’ वैद्यकीय परिषेदेचे आयोजन

 

कोल्हापूर: कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आय एम ए)च्यावतीने नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी ‘हॉस्पिकॉन 2019’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथील त्रिमूर्ती ऑडिटोरियम येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ.अशोक जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर परिषदेचे उद्घाटन नॅशनल आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.
सध्या बदलत जाणारे डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध, डॉक्टरांना रोज वैद्यकीय सेवा देताना ज्या अडचणी येतात त्या कशा दूर कराव्यात याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन या परिषदेमध्ये केले आहे.
तसेच नवीन हॉस्पिटल चालू करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात, महानगरपालिकेच्या वतीने लागणाऱ्या परवान्यासाठी कोणत्या बाबींची पूर्तता करावी, जीवनाचा आणि वैद्यकीय सेवेचा समतोल कसा साधावा, वैद्यकीय सेवेनंतर निवृत्तीचे नियोजन कसे करावे, रुग्णाची संभाषण करत असताना योग्य प्रकारे सल्लामसलत कशी करावी, डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखावे याबद्दलची चर्चासत्रे या परिषदेमध्ये होणार आहेत. नवीन क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचा प्रभाव वैद्यकीय सेवेवर कसा पडणार आहे याबद्दल एक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या वैद्यकीय परिषदेमध्ये आर.अक्कीशेटी,डॉ. डी ए. पाटील, डॉ.कांतीकर, ऍड. संतोष शाह,डॉ.दिलीप जाधव, डॉ. बि.के. त्रिवेदी,डॉ.कविता शाह, डॉ.संतोष प्रभू, डॉ. मुराद लाला, डॉ. जयेश लेले, डॉ. मंगेश पार्टे,डॉ. गोपीनाथ शेनॉय, डॉ. आनंद कुलकर्णी,डॉ. एन. जे. करणे, डॉ. जगदिष हिरेमाठ,डॉ. सुशील गजवानी, डॉ.संतोष कदम सहभागी होणार आहेत. या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर आणि उपाध्यक्ष डॉ. अजित लोकरे आहेत. तरी या वैद्यकीय परिषदेचा लाभ सर्व डॉक्टरांनी घ्यावा असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, सचिव डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. आनंद कामत, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.,शैलेश कोरे,डॉ. अरुण धुमाळे,डॉ. आशा जाधव, डॉ.सूर्यकांत मस्कर, डॉ. अजित लोकरे यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!