विवेकानंद कॉलेजच्या वतीने ‘स्पंदन’ कलामहोत्सवाचे आयोजन

 

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजच्या बी व्होक आणि कम्युनिटी कॉलेज अंतर्गत ग्राफिक डिझाईनिंग, फाउंड्री टेक्नॉलॉजी, ॲनिमेशन फिल्म मेकिंग व कम्युनिटी कॉलेज ॲडव्हान्स डिप्लोमा इन फोटोग्राफी हे अभ्यासक्रम सुरू आहेत. या तिन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा वर्गकाम व कलाकृतींचे प्रदर्शन स्पंदन 2019 चे आयोजन विवेकानंद कॉलेज येथे 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रसिद्ध फोटोग्राफर रमण कुलकर्णी यांच्या हस्ते, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती प्राचार्य एस. वाय. होनगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी ‘स्पंदन’ या महोत्सवाचे आयोजन विवेकानंद महाविद्यालयामध्ये केले जाते. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता वाइल्ड लाइफ फोटोग्राफर रमण कुलकर्णी यांची ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न होणार आहे. तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांचे दुपारी तीन वाजता ‘ग्राफिक डिझायनिंग ॲनिमेशन आणि व्यंगचित्रे’ या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. सात फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पेपर अँड शेपर चे संस्थापक चिदंबर शिंदे यांचे टाकाऊ पेपर पासून विविध इकोफ्रेंडली वस्तू बनवण्यासाठी ची ‘पेपर अँड शेपर’ ही कार्यशाळा होणार आहे.
आठ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील साई चित्रकला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रसिद्ध चित्रकार मुक्ता पुसाळकर यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन याचे आयोजन केले आहे. तसेच यावर्षी पासून विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी यासाठी विवेकानंद यांच्या नावाने ‘विवेकानंद महोत्सव’ सुरू करण्यात येणार आहे. असेही प्राचार्य एस वाय होनगेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रा. सतिश गायकवाड, प्रा. राहुल इंगवले, प्रा. सतीश उपळावीकर, प्रा. सचिन जमादार, प्रा. श्रद्धा शिंदे, प्रा. अक्षय खोत, प्रा. रविराज सुतार पूजा कोपर्डेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!