
कोल्हापूर: एकाच छताखाली घरासाठी सर्व उपयुक्त गोष्टी या भव्य व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक प्रदर्शनामध्ये बघायला मिळत आहेत. कोल्हापुरात हे प्रदर्शन दर तीन वर्षांनी भरत आहे याची व्याप्ती वाढवण्यासाठी पुढील प्रदर्शन हे मेरी वेदर ग्राऊंडवर घ्यावे असे खासदार धनंजय महाडिक यांनी सुचवले. कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. अध्यक्ष महेश यादव व महाराष्ट्र क्रीडाईचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी ब्लु लाईनचा विषय मार्गी लागला आहे. बी ट्युनरबाबतीत पाठपुरावा करेन. रेडीरेकनरचे दर अजूनही वाढलेले नाहीत आणि निवडणुकीच्या तोंडावर हे वाढणारही नाहीत. जीएसटी कमी करण्यासाठी हा प्रश्न समितीसमोर मांडेन अशी ग्वाही दिली. तसेच कोल्हापूरच्या वैभवात भर टाकण्यासाठी बास्केट ब्रिज साठी प्रयत्न केले आहेत. लवकरच त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी संजीवनी आहे. यावर्षी रेल्वेस्थानकाला एक 125 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित कोकण रेल्वेची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. साडे तीन हजार कोटींचा हा प्रकल्प 36 महिन्यात पूर्ण होणार आहे. कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. 274 कोटींचा हा प्रकल्प मंजूर केला गेला आहे. एप्रिल मध्ये कोल्हापूर- तिरुपती विमान सेवा लवकरच सुरू होणार आहे.मुंबई विमानसेवा सुरु झाली की लवकरच आयटी पार्क कोल्हापूर मध्ये होणार असेही खासदार महाडिक यांनी जाहीर केले.
लोकांना परवडणारी घरे मिळण्यासाठी म्हाडा नेहमीच सहकार्य करेल.तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वेगळा विभाग सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे. असे म्हाडा पुणे चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
पंधरा त लाख ते दोन कोटी पर्यंत किमतीची घरे या दालन प्रदर्शनात उपलब्ध आहेत. स्वतः चे घर साकारण्याची संधी इथे मिळणार आहे. प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर मध्ये तीन हजार घरे इथे उपलब्ध आहेत.असे दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष सचिन ओसवाल यांनी सांगितले.
सर्वसामान्य बांधकाम व्यावसायिकाला ज्या अडचणी असतात त्या दूर व्हाव्या व त्यातून मार्ग निघावा यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. तसेच जीएसटी प्रणालीमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. कोणत्याही शहराचा विकास व्हायचा असेल तर दळणवळण साधने विकसित असणे गरजेचे आहे. यासाठी कोल्हापूरला कोकण रेल्वे जोडावी अशी मागणी महाराष्ट्र क्रीडाई चे अध्यक्ष राजीव पारीख यांनी केली.
प्रास्ताविकात क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले,” दर तीन वर्षांनी झालं हे भव्य बांधकाम विषयक प्रदर्शन क्रीडाईच्या वतीने भरवले जाते. आता याची व्याप्ती वाढलेली आहे. 1988 साली स्थापना झालेल्या संघटनेला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.यंदाचे हे दहावे प्रदर्शन आहे. पण कोल्हापुरात आज बांधकाम व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेची धोरणे यांचा त्रास बांधकाम व्यवसायिकांना होत आहे. यात लवकरच सुधारणा व्हाव्यात तसेच सोळा मजल्यापर्यंतच्या इमारतींना बांधकाम परवानगी मिळावी,ब्लु लाईन,बी ट्युनरचे प्रश्न मार्गी लागावे, रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत, एक टक्का एलबीटी सेस आकारला जातो तो अजून रद्द केलेला नाही. यामुळे फ्लॅटधारकांना भुर्दंड बसत आहे. या अडचणी लवकरच दूर झाल्या तर बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल. याबाबतचे निवेदन ही खासदार धनंजय महाडिक यांना यावेळी देण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी महापौर सौ. सरिता मोरे, आमदार चंद्रदीप नरके, पुणे म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार अमल महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम,रत्नेश शिरोळकर, राजीव पाटील,व्ही. बी. पाटील यांच्यासह बांधकाम व्यावसायिक, क्रीडाईचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply