
कोल्हापूर : शाहूनगर आणि दौलतनगर इथल्या नागरिकांचे स्वतःचे घर असावे असे अनेक वर्षाचे स्वप्न होते. त्यांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लावून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. यापुढेही या भागातील प्रॉपर्टी कार्डाचें प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. ते दौलतनगर इथल्या प्रॉपर्टी कार्ड लाभार्थी लक्ष्मण कानेकर यांच्या नूतन घराचा पायाभरणी शुभारंभा प्रसंगी बोलत होते.आमदार सतेज पाटील यांनी दौलतनगर या भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊन हक्काचे घर उपलब्ध करून दिले. या भागातील नागरिकांची अनेक वर्षाची असलेली ही मागणी गृहराज्यमंत्री असतांना २०१४ साली पूर्ण केली. आज प्रॉपर्टी कार्ड लाभार्थी लक्ष्मण कानेकर यांच्या नूतन घराचा पायाभरणी शुभारंभ त्यांनी स्वतः केला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वतःचे घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते त्याची आज खऱ्या अर्थाने पूर्ती झाली असल्याचे सांगितले. प्रॉपर्टी कार्डचे काम करत असतांना अनेक समस्यांवर मार्ग काढत लोकशाहीतील मूलभूत अधिकार मिळवून या नागरिकांना दिला. मात्र विरोधक खोटी प्रॉपर्टी कार्ड दिले असल्याची वल्गना करत आहेत. मात्र आता त्यांचा खोटेपणा या पायभारणीत मुजुन गेला आहे. ज्या अफवा होत्या त्याही आता मुजुन जातील. शहरातील गरजूंना आपल्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले आणि त्याच्याच हाती आणि या ठिकाणी घराचा पायाभरणी शुभारंभ झाला ही अत्यंत आनंददायी बाब असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच हा क्षण सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखा असून मला याचे समाधान मिळतंय. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत मात्र लोकांची कामे करू नका असं अधिकाऱ्यांना सांगणारी लोकप्रतिनिधी आहेत ही शोकांतिका आहे. लोकांच्या कामाची कास धरली आहे. लोकांना खरे काय आणि खोटं काय हे लवकरच समजेल. सामान्यांना न्याय देण्यासाठी यापुढेही या भागातील जी प्रलंबित प्रॉपर्टी कार्डाची कामे पूर्ण करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
यावेळी या भागातील जेष्ठ नागरिक मारुती शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांच्यामुळेच आम्हाला स्वतःची घरे मिळाली. जे लोक हे खोट आहे असं म्हणतात तर आमचे तुम्हाला खुले आव्हान आहे जाहीर करून दाखवा, साडेचार वर्षात आमदार कोण आहेत हे इथल्या जनतेला माहीत नाहीत. त्यांना आम्ही हे प्रॉपर्टी कार्ड खरे असल्याचे दाखवू. आमदार सतेज पाटील यांचे हे ऋण आगामी निवडणुकीत आम्ही फेडणार असून विरोधकांचा खोटेपणा हणून पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मारुती शिंदे यांनी दिला.
आमदार सतेज पाटील यांनी आपल्याला हक्काचे घर मिळवून दिलंय. मात्र दक्षिणचे भाजपचे आमदार ही प्रॉपर्टी कार्ड खोटी आहेत असा खोटा प्रचार करत आहेत. त्यांना आता याचे उत्तर मिळाले असले अशी प्रतिक्रिया लाभार्थी लक्ष्मण कानेकर यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी दिल्या.
आमदार सतेज पाटील यांनी असंच सामान्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही या भागातील महिलांनी दिली.
यावेळी माजी नगरसेविका संगीता देवेकर, उमेश पोवार, अनिल देवेकर, मारूती शिंदे,अमोल देशिंगकर, मंदार जगदाळे, मिलिंद सुतार,जितू ठोबळे, सुरेश माने, राजू पाटील, अजित पटेल, पप्पू पाटील,वंदना कानेकर, इंदूबाई माने, लक्ष्मीबाई ठोबळे आदि सहभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपाथित होते.
Leave a Reply