
कोल्हापूर : व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणारे खूप सारे अभ्यासक्रम सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यामुळेच आपले करिअर निवडण्याचे असंख्य मार्ग युवकांना मिळाले आहेत. त्यामध्ये एम.सी.ए.या एकमेव कोर्स मूळे आयटी क्षेत्रात मोठया प्रमाणात भारतात व विविध देशांत चांगल्या( सहा अंकी ) पगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
आयटी क्षेत्राशी पूरक असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान,कौशल्य, भविष्यातील संधी,विद्यार्थीहित,आणि इतर गोष्टींची दखल घेत एम.सी.ए. (व्यवस्थापन) चा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार केला आहे.
एम.सी.ए. प्रवेश प्रणाली मध्ये गतवर्षीपासून महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे बदल केला आहे.आणि तो बदल अजूनही विद्यार्थी पालक यांचेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
शैक्षणिक वर्ष 2019-20 करीता MCA-MH-CET प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रवेश परीक्षेची तारीख 23 मार्च 2019 ही आहे.फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2019 ही आहे.महत्त्वाचे म्हणजे एमसीए कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी MH -CET ही एकमेव परीक्षा आहे.अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा.मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ एम.सी.ए. इन्स्टिट्यूट(MAMI) चे अध्यक्ष डॉ.अमोल गोजे यांच्यावतीने डॉ. शिवाजी मुंढे, डॉ. तानाजी दबडे, डॉ.बाळासाहेब बी.यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Leave a Reply