
कोल्हापूर : कोल्हापूरमधील खवय्यांना वेगवेगळ्या लज्जतदार आणि नाविन्यपूर्ण डिशचा आस्वाद घ्यायला नेहमीच आवडते त्यांना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बनवलेले जेवण निश्चितच पसंत पडते त्यासाठी अनेक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून हॉटेल गझिबो चुल्हा चौका हॉटेल नव्या रंगात नव्या ढंगात सुरू करण्यात आले आहे अशी माहिती हॉटेल च्या संचालिका सौ जिजा महेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोकुळ शिरगाव येथील मयूर पेट्रोल पंपासमोर १९८५ सालापासून हॉटेल गझिबो सेवेत आहे. बदलत्या पिढीतील ग्राहकांची नवी आवड आणि नवी अपेक्षा लक्षात घेऊन गझिबोमध्ये नव्या व्यवस्थापनाखाली सेवा सुरू करण्यात आली आहे ५ ऑगस्ट २०१८ रोजी हॉटेलचे नूतनीकरण करून जाणीवपूर्वक आणि वैशिष्ट्य अंतर्भूत करण्यात आली आहेत या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जेवण मातीच्या भांड्यामधे शिजवले जाते त्याच प्रमाणे सर्व जेवण चुलीवरच बनविण्यात येते .
त्यामुळे ग्रामीण भागातील अस्सल मराठमोळी पदार्थ चाखताना ग्राहकांना अनुभवायला मिळते त्याच प्रमाणे येथे जेवण बनविण्यासाठी उत्तम दर्जाचे तेल वापरले जाते कच्चा घाण्याच्या शेंग तेलामध्ये सर्व डिशेस बनविल्या जातात. रोजच्या आहारातील मीठ यामुळे ब्लडप्रेशर सारखे अनेक विकार होतात हे लक्षात घेऊन येथे पदार्थ बनविताना जाणीवपूर्वक सैंधव मीठ याचाच वापर केला जातो.
शाकाहारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रीयन मेनू पंजाबी मेनू उपलब्ध आहे तसेच अस्सल खान्देशी भरले वांगे आणि भाज्यांची चव या ठिकाणी अनुभवायला मिळते .शिवाय सकाळी नाश्त्यासाठी कोल्हापुरी अस्सल मिसळ पाव यासाठी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बनवलेल मटण, कोल्हापूर मटन, चिकन मटन ,हैदराबादी, मोगलाई डिशेस येथे उपलब्ध आहेत. लज्जतदार चिकन दम बिर्याणी आणि मटण दम बिर्याणी ही एक खासियत आहे पण राज्यात कुठेही मिळत नाही असे तंदूर खेकडे, तंदूर मासे ,तंदूर प्रान्सच्या डिशेस या ठिकाणी उपलब्ध आहेत.
हॉटेल मध्ये प्रथमच लाईव्ह बार्बेक्यूची सोया उपलब्ध करण्यात आली असून तिचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ज्वारी ,बाजरी ,तांदूळ, चण्याची भाजी, आणि भाकरी अशा स्वरूपाच्या आहेत त्याच बरोबर चपाती,तंदूर रोटी उपलब्ध आहे. हॉटेलमध्ये ९ ठिकाणी आसनव्यवस्था , टेरेसवर दोन ठिकाणी लॉनवर आणि गार्डनमध्ये तसेच समूह भोजनासाठी खास अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलची वेळ दुपारी एक ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे शिवाय अन्न याची नासाडी होऊ नये यासाठी जेवणासाठी ॲडव्हान्स बुकिंग करावे लागते मगच जेवण बनविले जाते असे सौ.जिजा सावंत यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला अनिल यादव यांच्यासह हॉटेलचे कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply