
कोल्हापूर: लहान मोठी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी डॉक्टरांना नोंदणी,नुतनीकरण यासाठी अनेक परवाने मिळवण्याची आवश्यकता असते.यासाठी अनेक कायद्यांचे पालन करावे लागते. या कायद्यांमध्ये सतत बदल होत असतात. यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.यासाठी सरकारी यंत्रणा सुलभ होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केली.मेडिकल असोसिएशन आयोजित ‘हॉस्पिकॉन’ या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नवीन क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचा प्रभाव वैद्यकीय सेवेवर कसा पडणार आहे याबद्दल ते बोलत होते. महाराष्ट्रात या कायद्यात चांगले बदल करण्यात आले असल्याचे ही डॉ.जयेश लेले यांनी सांगितले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्यावतीने नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी ‘हॉस्पिकॉन 2019’ या दुसऱ्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथे संपन्न झाली. वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरावी म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असे अध्यक्ष डॉ.अशोक जाधव यांनी सांगितले.आपल्या अनुभव, कौशल्य आणि तंत्र यामुळे रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतात. त्यामुळे डॉक्टरांना देवही समजू नका आणि गुन्हेगार ही समजू नका.हा लोकांचा गैरसमज दूर करणे हाच या परिषदेचा हेतू आहे, असे परिषेदेचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर यांनी सांगितले.
सध्या बदलत जाणारे डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध, डॉक्टरांना रोज वैद्यकीय सेवा देताना ज्या अडचणी येतात त्या कशा दूर कराव्यात याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन या परिषदेमध्ये केले गेले.
तसेच नवीन हॉस्पिटल चालू करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात, महानगरपालिकेच्या वतीने लागणाऱ्या परवान्यासाठी कोणत्या बाबींची पूर्तता करावी, जीवनाचा आणि वैद्यकीय सेवेचा समतोल कसा साधावा, वैद्यकीय सेवेनंतर निवृत्तीचे नियोजन कसे करावे, रुग्णाची संभाषण करत असताना योग्य प्रकारे सल्लामसलत कशी करावी, डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखावे याबद्दलची चर्चासत्रे या परिषदेमध्ये पार पडली.
या वैद्यकीय परिषदेमध्ये आर.अक्कीशेटी,डॉ.डी ए. पाटील,डॉ.कंठीकर, ऍड. संतोष शाह,डॉ.दिलीप जाधव, डॉ. बि.के.त्रिवेदी,डॉ.कविता शाह, डॉ.संतोष प्रभू, डॉ. मुराद लाला, डॉ.जयेश लेले, डॉ. मंगेश पार्टे,डॉ. गोपीनाथ शेनॉय, डॉ.आनंद कुलकर्णी,डॉ.एन.जे.करणे, डॉ.जगदिष हिरेमठ,डॉ.सुशील गजवानी, डॉ.संतोष कदम सहभागी झाले होते.असोसिएशन च्या फ्लॅश या नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, परिषेदेचे उपाध्यक्ष डॉ.अजित लोकरे,सचिव डॉ.आबासाहेब शिर्के, डॉ.आनंद कामत, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.आशा जाधव,डॉ.शैलेश कोरे,डॉ.अरुण धुमाळे, डॉ.सूर्यकांत मस्कर,डॉ. रमाकांत दगडे,डॉ. ए. बी. पाटील,डॉ.देवेंद्र होशिंग, डॉ. संतोष प्रभू,डॉ. शितल देसाई, डॉ. नवीन घोटणे यांच्यासह पाच जिल्ह्यातील चारशे हुन अधिक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
Leave a Reply