
महाराष्ट्राच्या जनतेला, हास्य जत्रेत सामिल झालेल्याप्रेक्षकांना, जजेस् आणि पाहुणे कलाकारांना पोट धरुनआणि मनमोकळेपणाने हसायला लावणारा आणि अव्वलस्थानावर असणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’. या कार्यक्रमात एखादा छोटाशाचुटकुला, सॉलिड कॉमेडी पंच कधी अचानकपणे हास्याचाधमाका करेल याचा नेम नाही. प्रेक्षकांनी विचार केलेनसतील असे अनेक प्रसंग विनोदी बनवून त्यावर उपस्थितकलाकारांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि वाह! वाह! अशीदाद कशी मिळवावी हे महाराष्ट्राचे विनोदवीर यांना अचूकठाऊक असते.वेगवेगळ्या विषयांच्या आणि थीमच्या आधारावर कॉमेडीस्किट्स सादर करुन झाल्यावर येत्या आठवड्यात नेमकीकोणती थीम पाहायला मिळणार याकडे महाराष्ट्राच्याजनतेचे लक्ष हमखास असणार. तर पुढील आठवड्यात‘प्रवास’‘ट्रॅव्हल’ ही थीम असणार आहे. प्रवास केल्यावरप्रवासवर्णन अनेकांनी केलंय पण या विनोदी कलाकारांचाप्रवास आणि ठिकाण हे दोन्ही मनोरंजक असणार आहेत.विशेष म्हणजे या थीमचा आनंद लुटण्यासाठी ‘लकी’ यामराठी सिनेमाची टीम उपस्थित होती. ‘ट्रॅव्हल’ थीमवरआधारित कॉमेडी स्किट्सने दिग्दर्शक संजय जाधव,अभिनेत्री दिप्ती सती आणि अभिनेता अभय महाजनया कलाकारांचे भरपूर मनोरंजन केले.पर्यटकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी प्रवास ही खास गोष्टअसते पण या कार्यक्रमातील कलाकारांचा प्रवास हा अगदीलक्षात राहण्यासारखा आहे. जसे की बस डेपो, एव्हरेस्टचढण्याचा प्लॅन, ५ मिनिटांची लाँग राईड आणि बरंचकाही. प्रवास या विषयावर मजेशीर पण काहीतरी घडूशकते हे पाहण्याचा योग आल्यामुळे ‘लकी’ सिनेमाचीथीम लकी ठरली आणि संजय जाधव, दिप्ती–अभययांनी पण एक अन् एक कॉमेडी पंचेस् बिनधास्तणे एन्जॉय केले.
Leave a Reply