
कोल्हापूर: पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. याशिवाय सरकारी नोकरीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या हजारो नोकरीविषयक उपक्रमांची माहिती देण्यासाठी ॲकॅडमी एज्यु जिनिअस ॲप तयार करण्यात आले अशी माहिती अकॅडमीचे मार्केटिंग हेड प्रवीण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पदवीनंतर हजारो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांवर अवलंबून असतात. मात्र येथे भरल्या जाणाऱ्या जागा व अर्ज करणारे विद्यार्थी यात खूप मोठी तफावत आहे. प्रत्येकाला यात यश मिळत नाही. त्यामुळे चार-पाच वर्षे अभ्यास करूनही अपयशी झाल्याने पदरी नैराश्य पडते. यावर उपाय म्हणून एज्यु जीनियस अकॅडमीचे हे ॲप निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये एमपीएससी यूपीएससी शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक नोकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ज्या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे, त्यानुसार नोकऱ्यांची माहिती आहे. नोकरी, त्यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा वेतन, मानधन याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. अशाच पद्धतीने सायन्स, कॉमर्स, इंजिनीरिंग, डिप्लोमा अभ्यासक्रमानुसार विविध सरकारी नोकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. या ॲपमुळे सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे ॲप प्ले स्टोरला उपलब्ध आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण शिंदे यांनी केले. पत्रकार परिषदेला समीर देशपांडे, हर्षल पन्हाळकर उपस्थित होते.
Leave a Reply