
कोल्हापूर : फिरोज शहा कोटला क्रीडांगण नुतनीकरण कामात दिल्ली डीस्ट्रीक्त क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अरुण जेटली यांच्या सहकार्याने करोडो रुपयांचा अपहार झाल्याचे दर्शनी पुरावे मिळाले आहेत.त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्री मंडळातून तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी आज कोल्हापूर आम आदमी पार्टीच्या वतीने शिवाजी चौक येथे निषेध करण्यात आला.करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध होते.त्यामुळे अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.त्यांचा निषेध करण्यात आला.यासंबंधीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी नारायण पोवार,निलेश रेडेकर,संदीप देसाई,उत्तम पाटील,जयवंत पोवार,वैशाली कदम यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply