
कोल्हापूर: निर्धार राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं स्मार्ट ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले एक अभ्यासू खासदार म्हणून खासदार धनंजय महाडिक यांनी आपला ठसा उमटवला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन पाटील यांनी केले. गेल्यावेळी राधानगरी तालुक्यातून 21000 मताधिक्य खासदार धनंजय महाडिक यांना मिळालं होतं यंदाच्या निवडणुकीत 32000 मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार ए वाय पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, ग्रामपंचायतींनी स्वयंपूर्णतेकडे अधिक लक्ष द्यावे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सीसीटीव्ही वायफाय यासारख्या सुविधा देऊन आपल्या गावाला स्मार्ट बनवा व त्यासाठी खासदार म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे असं मत व्यक्त केलं. यावेळी सलग तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी माजी आमदार के पी पाटील, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील
कौलवकर यांच्यासह राधानगरी परिसरातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply