
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदान येथे २१ डीसेंबर पासून सुरू असलेल्या डीजे ॲम्युझमेंट पार्क , रोबोट ॲनिमल नगरी आता केवळ १० दिवसांसाठी कोल्हापूरमध्ये सुरू असणार आहे याला कोल्हापुरकारांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन रवींद्रनाथ,सुनीलराज व मेहबूबपाशा यांनी केले आहे.
पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे लोकांना व वन्यप्राणी याना वावरता येत होते आता ते जंगला पुरतेच मर्यादित राहिले आहेत लहान मुले असू देत अगर मोठी व्यक्ती सर्वांनाच वन्यप्राणी सर्कशीच्या माध्यमातून पहावयास मिळत होते. अलीकडे शासनाने वन्यप्राण्यांचा सर्कशीमध्ये वापर यावर बंदी घातल्याने घोडे, हत्ती,उंट,कुत्री यांनाच सर्कशीमध्ये प्रत्यक्षपणे पाहता येते. मात्र हेच जंगल आणि या जंगलामध्ये असणारी वन्य प्राणी त्यांचा आवाज पाहण्याची व ऐकण्याची संधी आता कोल्हापूरकरांना मिळत आहे .केरळ मधील दिनेश कुमार, जयप्रकाश यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे व याचा आनंद कोल्हापूरकर गेली दिड महिने घेत आहेत . मेहबूबपाशा रवींद्रनाथ ,सुनील राज हे याचे व्यवस्थापक आहेत. यांनी सर्वांनी मिळून ही नगरी या मैदानाच्या ठिकाणी उभी केली आहे .याठिकाणी लोक खूप गर्दी करत आहेत.तर आता एका व्यक्तीच्या तिकिटावर एक व्यक्ती ही नगरी पाहू शकणार आहे तर शालेय मुलांनाही विशेष अशी सूट देण्यात आली आहे.तरी एकवेळ अवश्य या नगरिस भेट द्यावी असे रवींद्रनाथ,व सुनीलराज यांनी आवाहन केले आहे. या नगरीमध्ये कोल्हापूरकरांना निर्जीव प्राण्यांमध्ये जिवंतपणा असल्याचे पहावयास मिळत आहे “सेल्फी आर्ट गॅलरी “शिवाय स्टॉलच्या माध्यमातून मनसोक्त खरेदी व खाद्यपदार्थ खाण्याची संधी मिळाली आहे. शिवाय वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून धमाल-मस्ती लहान मुलांसह मोठी व्यक्ती करत आहेत.
या ठिकाणी उभे करण्यात आलेल्या जंगलात वेगवेगळी प्राणी यामध्ये उंट, हत्ती, सिंह ,वाघ, अवतार मधील पुरुष-महिला अस्वल ,डायनासोर्स, जिराफ, झेब्रा ,अजगर,हरीण आदि प्राणी पाहावयास मिळणार असून सेल्फी काढून घेत आहेत.

” सेल्फी आर्ट गॅलरी” मधून प्रत्यक्ष स्वतःचा फोटो काढत आहेत. यामध्ये याठिकाणी मदर तेरेसा, स्पायडरमॅन, समुद्रातील जहाज, अशा बऱ्याच चित्रांचा समावेश आहे.शिवाय ३० स्टॉल या ठिकाणी आहेत यामध्ये बेडशीट, खेळणी ,महिलाना लागणारे साहित्य, महिलांना लागणारे किचन साहित्य खरेदी करत आहेत.
तर खेळण्यांमध्ये लहान मुलांसाठी मोटरसायकल, ड्रॅगन ट्रेन, हेलिकॉप्टर ,क्रॉसवेल पाळणे ,पाण्यातील कोलंबस पाळणा,ऑक्टोपस असे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले असल्याने यामध्ये बसण्याचा आनंद ही नागरिक घेत आहेत. आता ही रोबोट ॲनिमल नगरी २५ फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूरमध्ये आहे शेवटचे १० दिवस आता ही नगरी पहावयास मिळणार असल्याने कोल्हापूरकरांनी याठिकाणी एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन व्यवस्थापकांनी केले आहे.
Leave a Reply