
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरात प्रचंड चुरस निर्माण झाली त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर मिळून 100 टक्के मतदान झाले.माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात हि लढत होत आहे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असताना महाडिक यांना पक्षाने उमेदवारी डावलून सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे या दोघात राजकीय हाडवैर आहे त्यामुळे दोघांनीही हि निवडणूक प्रतिष्तेची केली आहे.केली आहे त्यातून एका मताचा भाव तब्बल अर्धा कोटी वर गेला आहे .आज सकाळ पासूनच दोन्ही उमदेवाराचे समर्थक जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर दाखल झाले . हातकणगले,शिरोळ यासह सर्व तालुक्यातील मतपेटया बंदोबस्तात आज गवर्नमेंट पॉली टेकनीक येथे अणल्या गेल्या.संवेदनशील मतकेंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदानाला आठ वाजल्यापासून सुरवात झाली. चुरशीने 100 टक्के मतदान झाले. मतमोजणीसाठी प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे.
Leave a Reply