
कोल्हापूर : पाचगाव पाणी प्रश्नासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरली. रिकाम्या घागरी आणि बादल्या घेऊन हे आंदोलन केले. अनेक वर्षे पाचगावचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे.जीवन प्राधिकारणाच्या योजनेसाठी 3 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ती उपलब्ध करुन पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी आज करण्यात आली.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार,उप जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, तालुका प्रमुख विराज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply