
कोल्हापूर: ‘राईझींग स्टार्स’ या नावाखाली २०१८ मध्ये स्थापन झालेल्या अंध मुलांच्या समूहाने त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष गाण्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने आतापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात १५ कार्यक्रम केले.गायन, वादन अश्या सर्वच जबाबदाऱ्या शिताफीने पेलत सर्व कार्यक्रम उत्कृष्ट रित्या सादर केले.कोल्हापूरात १७ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे पुन्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी याच ग्रुपमधील एक कलाकार रोहन लाखे याला देण्यात येणार आहे. अशी माहिती शुभम चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.राजेंद्र नगर येथे राहणाऱ्या रोहन च्या घराला आग लागली आणि त्यात प्रापंचिक साहित्य, वाद्ये व इतर साहित्य जळून भस्मसात झाले. आपल्या मित्राला मदतीचा हात द्यावा या उद्देशाने हा कार्यक्रम सादर करणार असल्याचे ही शुभमने सांगितले.तरी कोल्हापूरच्या दानशूर व्यक्ती, तालीम, संस्था, संघटना यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस किरण रणदिवे, राजेंद्र गेजगे,मिलिंद कोंडूस्कर उपस्थित होते.
Leave a Reply