व्यापारी आणि उद्योजक  धनंजय महाडिक यांच्या पाठीशी, व्यापारी – उद्योजकांचा निर्धार

 

समाजातील सर्वच घटकांनी आपल्याला पाठबळ दिले आहे. त्यामध्ये जैन समुदायाचा प्रामुख्याने समावेश आहे. हा समाज केवळ कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेत्याच्या पाठिशी राहतो. म्हणूनच या समाजाचा पाठिंबा म्हणजे माझ्या कार्याचा गौरव असल्याचे आपण समजतो, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. रविवारी कोल्हापुरातील भक्तीपूजानगर येथे पार पडलेल्या मिसळ पे चर्चा या उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यापारी आणि उद्योजकांनी या उपक्रमाला मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, व्यापारी आणि उद्योजकांचे अनेक प्रश्‍न पहिल्यांदाच संसदेत मांडले. जीएसटी कमी करण्यासंदर्भात प्रयत्न केले. सिमेंटचे दर, बांधकाम साहित्यांच्या दराबाबतचे प्रश्‍न संसदेत उपस्थित केले. त्यामुळे व्यापारी आणि उदयोजकांच्या प्रश्‍नासाठी सदैव तत्पर असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी येत्या निवडणूकीत राहणार असल्याचे व्यापारी – उद्योजकांनी यावेळी जाहीर केले. तसेच परिसरातील स्थानिक रहिवाशांनीही खासदार महाडिक यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. 

सर्वसामान्य घटकांशी थेट संवाद साधण्याच्या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांनी मिसळ पे चर्चा हा उपक्रम हाती घेतला होता. त्याला सर्वच स्तरातून उदंड पाठिंबा मिळाला. रविवारी कोल्हापुरातील भक्तीपूजानगर येथे हा उपक्रम पार पडला. त्याला व्यापारी- उद्योजक आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रतिसाद दिला. खासदार महाडिक यांच्या हस्ते जैन मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी खासदार महाडिक यांच्या कार्याबाबत भावना व्यक्त केल्या. जयेश ओसवाल, भरत ओसवाल, पारस ओसवाल यांनी, खासदार महाडिक यांच्या पुढाकारामुळं केंद्र सरकारने व्यापार्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे दाखले दिले. तसेच मोठा निधी खेचून आणून प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे अशा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीच्या पाठिशी आपण ठामपणे उभे राहू, असे या वक्त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याचा आवाज संसदेत पोहचवला, केंद्र सरकारला आपल्या प्रश्‍नांची दखल घ्यायला लावली आणि त्यामुळेच हजारो कोटींचा निधी खेचून आणता आला, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. विकासकार्याची गती ठेवण्यासाठी पुन्हा पाठबळ द्या, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. त्यानंतर उपस्िथतांनी चमचमीत मिसळ-पावचा आनंद घेतला. कार्यक्रमाला हितेश ओसवाल, नगरसेवक ईश्‍वर परमार, किरण नकाते, सुरेश गायकवाड, राजू ओसवाल, माणिक जैन, कुलदीप गायकवाड यांच्यासह मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!