
कोल्हापूर: 2014 साली संबंध देशभरात मोदी लाट असतानाही खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाच्या जोरावर कोल्हापुरातून विजयश्री खेचून आणली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात विकासकामांचा धडाका लावला. कोल्हापूर जिल्ह्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले अनेक प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेमध्ये मांडून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच सलग तीन वर्ष त्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. *खासदार धनंजय महाडिक यांच्या या चमकदार कामगिरीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित केली आहे. पाच वर्ष केलेल्या अथक परिश्रमांची आणि कामगिरीची ही पोचपावती असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं. कोल्हापूरच्या जनतेच्या पाठबळावर आणि आशीर्वादाच्या जोरावर आपण पुन्हा एकदा निश्चितच खासदार बनू असा आत्मविश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Leave a Reply