महापालिकेच्यावतीने शहरात मतदान जनजागृती रॅली मोठया उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी महापालिकेच्यावतीने आज शहरात मतदान जनजागृती रॅलीचे मोठया उत्साहात संपन्न झाली. मतदान जनजागृती कार्यक्रमातंर्गत मतदानाचा अधिकार 100 टक्के बजाविणेबाबत सर्व मतदारांना मतदानासाठी प्रेरित व प्रोत्साहित करणे तसेच मतदानाचा टक्का वाढविणेसाठी या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीची सुरुवात महापालिका विठ्ठल रामजी शिंदे चौक येथून होवून शिवाजी पुतळा- भवानी मंडप- बिनखांबी गणेश मंदीर- महाद्वार रोड- पापाची तिकटी- लुगडी ओळ- आईसाहेब महाराज पुतळा ते दसरा चौक या मार्गावरुन नेण्यात आली. रॅलीमध्ये मतदानाविषयी घोषवाक्यांचे फलक व सर्वांनी विविध घोषणा देवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आयुक्त पी.शिवशंकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी 100 टक्के मतदान करुन सर्वांनी इतरांना मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन केले. कोल्हापूर कॉलींगचे पारस ओसवाल यांनीही नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवारांची निवड करावी असे आवाहन केले.
रॅली दरम्यान कोल्हापूर कॉलींगमार्फत नागरिकांना मतदान जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करणेत येत होते. कोल्हापूर कॉलींगचे शरद मिराशी यांनी दसरा चौक येथे सर्वांना मतदान करण्याविषयीची शपथ दिली. दसरा चौक येथे सायबर कॉलेजच्या विद्यार्थी/विद्यार्थीनी यांनी पथनाटय सादर करुन या रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीमध्ये महापालिकेचे अधिकारी/ कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कोल्हापूर कॉलींगचे पदाधिकारी सदस्य, श्री साई फौंडेशनचे सदस्य, समुदाय विकास संस्था, विविध भागातील बचत गटाच्या महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपायुक्त विजय खोराटे, ज्ञाने­ार ढेरे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, रवका अधिकारी सुधाकर चल्लावाड, अस्थापना अधिक्षक विजय वणकुद्रे, तेजश्री शिंदे, अग्निशमन दलाचे जवान, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत शहरातील फिरणाऱ्या कचरा व घंटागाडयावर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणारे मजकूर प्रसारित करणेत आले आहेत. शहरात महत्वाच्या ठिकाणी डिजीटल बोर्ड लावणेत आले आहेत. के.एम.टी. बसेसवर जनजागृतीचे मजकूर प्रसारित करणेत येत आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर मतदान जनजागृतीपर मजकूर प्रसारित करणेत येत आहे. याद्वारे महापालिकेमार्फत जनजागृती करणेत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!