
कोल्हापूर : भाजप – ताराराणी आघाडी ची कोल्हापुरात सत्ता येणार आणि विकासातून कोल्हापूर चा कायापालट करणार असा ठाम विश्वास आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेन्द्राजी फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील मध्य वस्तीत असलेल्या ‘दि प्रायवेट हायस्कूल’ च्या मैदानात भाजपा – ताराराणी आघाडी व मित्रपक्ष यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या प्रसंगी बोलताना ताराराणी चे अमल महाडिक म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे कोणत्याही मुद्देसूद चर्चा न करता फक्त वैयक्तिक टीका करत आहेत यातून त्यांची पराभूत मानसिकता दिसून येत आहे. जर आधी विकासकामे केली असती तर आज इतकी होर्डींग लावायची गरजच लागली नसती.आर पी आय चे शहराध्यक्ष श्री कांबळे यांनी कोल्हापुरातील तरुणांची माथी भडकावण्याचे काम फक्त पालिकेतील सत्ताधार्यांनी केली असा आरोप केला. मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही, मी कोल्हापूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. कोणी कितीही टीका केली तरीही तरी भाषेचा स्तर न बिघडवून देत विधायक कामे करत राहणार. कोल्हापूर शहराला श्रीमंत शहर बनवणार आणि अंतरराष्ट्रीय विमानतळ बनवणार, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी वाढवणार. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणार, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणार असे आश्वासन पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांचे खंडन करून कॉंग्रेस राष्ट्रवादी वर चौफेर टीका केली. राज्यातील ६४ टोल बंद करण्याची हिम्मत फक्त या कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्यातच आहे.राज्यात टोल कोणी आणला? कोल्हापूरच्या वेशीवर पहिली टोल पावती कोणी फाडली? चंद्रकांत दादा प्रामाणिक असल्यामुळेच आधीचे बेईमान व भ्रष्ट राज्यकर्ते दादांना घाबरत आहेत. आणि त्यातूनच पराभूत मानसिकतेतून खालच्या पातळीचे आरोप करत आहेत. गेल्या १५ वर्षात महाराष्ट्राचे व कोल्हापूरचे वाटोळे या कॉंग्रेस सरकारने केले. यांना मागील १५ वर्षात राज्याचा विकास करण्यापासून कोणी अडवल होतं?प्रामाणिक आणि स्वच्छ राज्यकर्ते असतील तर कोणत्याही विकासकामाला कधीही निधी कमी पडत नाही. कोल्हापूर मध्ये भाजप ताराराणी आघाडीची सत्ता येणार आणि आम्ही कोल्हापूरचे चित्र पालटून टाकणार. विकसित कोल्हापूर साठी सर्वांनी भाजपा ताराराणी पक्ष व मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि कोल्हापूर ला स्मार्ट शहर बनवा असे आवाहन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरवासियांना केले.
Leave a Reply