
घुणकी : येथील ग्रामचावडीसमोर जगातील कामगारांविषयीचे महत्त्व सांगणारा दिवस म्हणून ”१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर आज संपूर्ण भारतात देखील हा ”कामगार दिन” अगदी शांततेत साजरा केला जातो. हा दिन कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो. कामगार चळवळींच्या या गौरवासाठी पाळण्यात येणा-या या दिवसाचे औचित्य साधून आज गावामध्ये शासकीय अधिकरी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अनिल थोरात यांच्या हस्ते तिरंगा फडकवत हा दिन साजरा करण्यात आला. तसेच या दिवसाचे आणखी ऐतिहासिक महत्त्व असे कि, याच दिवशी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचेही बलिदान या महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांनाही श्रदांजली वाहण्यात अली.
यावेळी उपस्थितीत माजी सैनिक संपत परीट, ग्रामसेवक अशोकराव भोसले, तलाठी प्रशांत काळे, पोलीस पाटील संदीप तेली, कोतवाल लक्ष्मण पवार, शिवाजी खताळ, मुकुंद पाटील, आरोग्य सेवक केंद्राचे प्रमुख, तसेच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतीचे प्रदीप मोहिते, अनिल थोरात, दिलीप पाटील, दिनकर पाटील,संग्राम कक्ष श्रीकांत मोहिते, आकाश जाधव, वारणा दूध संचालक राजवर्धन मोहिते, सरपंच राजाक्का रासकर, उपसरपंच प्रल्हाद पाटील, आदी ग्राम सदस्य व स्थानिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
Leave a Reply