
कोल्हापूर : नॅशनल स्पोर्ट्स अकॅडेमी ने आयोजित केलेल्या गोवा फुटबॉल फेस्टिवल २०१९ ऑल इंडिया इन्व्हिटेशन लीग मध्ये पहिल्यांदा कोल्हापूर मधून रग्गेडियन फुटबॉल अकॅडेमी ची १४ व १२ वयाखालील व वयोगटातील ३ संघ सहभागी होत आहेत.
या स्पर्धा २ मे २०१९ ते ६ मे २०१९ रोजी कलंगुट, गोवा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच संपूर्ण भारतातून अनेक संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत भाग घेत असलेल्या मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी व फुटबॉल मध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना भक्कम व्यासपीठ मिळावे तसेच भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय खेळात अजून चांगली संधी मिळण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
कोल्हापूर मधून रग्गेडियन टीम जावी यासाठी रग्गेडियन चे AIFF सर्टिफाइड कोच कमलेश मराडिया यांनी रग्गेडियन फुटबॉल ट्रैनिंग कॅम्प आयोजित करून संघांची निवड केली आहे.
रग्गेडियन फुटबॉल च्या तिन्ही संघांसोबत रवाना होतेवेळी सेंट. झेविअर्स चे अँथोनी सर, रग्गेडियन चे पारस पाटील, पॉवरलिफ्टर बॉडीबिल्डर सुनील कोनवडकर, रग्गेडियन चे संस्थापक आकाश कोरगांवकर, जे. के. ग्रुप चे हेमंत शहा, जे. के. ग्रुप चे संस्थापक जितूभाई शहा, सेंट. झेविअर्स चे मुख्याध्यापक फादर जेम्स थोरात, जे. के. ग्रुप चे उप्पल शहा, सहाय्यक पोलीस अधिकारी, हायवे ट्राफिकचे अविनाश पोवार, समाज सेवक स्वप्नील पारते, सेंट. झेविअर्स चे प्रशासक रुजेय गोनसालवीस, रग्गेडिअन फुटबॉल अकॅडेमी सह संस्थापक कमलेश माराडिया व रग्गेडिअन फुटबॉल अकॅडेमी चे कोच निखिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
Weldone Kamlesh Sir, Keep it up.