
कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संयुक्त रविवार पेठ मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार पेठ भागातील ७० ते ८० मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या ही शिवजयंती गेली दहा वर्षे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.उत्सवाचे उद्घाटन ३ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांचा भव्य चित्ररथ जो २०१८ च्या स्वातंत्र्यदिनसंचालना मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथाची प्रतिकृती आणि तांत्रिक देखावा आहे. तो रथ कोल्हापुरात या शिवजयंती उत्सवानिमित्त बघायला मिळणार आहे.तसेच कोल्हापुरात प्रथमच भव्य २० बाय ९० पिक्सल व्हिडिओ लाईट सिस्टीम पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक तलवारी, विविध शस्त्रे यांचे शस्त्र,नाणी, पुस्तके प्रदर्शन, शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारे टी शर्ट,टाटू,स्टॉल्स ऐतिहासिक पोवाडा,लहान मुलांच्यासाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा अश्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य अतिषबाजी करण्यात येणार आहे.
शिवजयंतीच्या मुख्य दिवशी सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ व सुंठवडा वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे केरळचे वाद्यवृंद पारंपारिक वेशभूषेसह, लेझीम ढोल पथक व इतर वाद्य त्याचप्रमाणे महिलांचा फेटा बांधून लक्षणीय सहभाग असणार आहे.
या माध्यमातून उर्वरित सर्व निधी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,बिंदू चौक येथे आरो शुद्ध पाणी प्लांट, लहान मुलांसाठी आरोग्य विमा यासाठी देण्यात येणार आहे. तरी कोल्हापुरातील नागरिकांनी या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपल्या लहान मुलांसह नक्की सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेस अजित गायकवाड, मोहन पोवार,सुनील खोत,बाळासाहेब मुधोळकर, गजानन तोडकर, रवींद्र पाटील,विनायक चंदूगडे, संजय तोरस्कर, महेश ढवळे, रतन हुलस्वार, पप्पू घोटणे, सुमित पवार,अशोक भोसले, आप्पा लाड, मिलिंद कणसे,रवी माने, सचिन तोडकर, विशाल शिराळकर,ओंकार खराडे,माजी नगरसेवक विनायक फाळके आदी उपस्थित होते.
Leave a Reply