
कोल्हापूर : शिवाजी पूल सुरू होताना पुरातत्व खात्याच्या अनेक अटी होत्या. परंतु त्या पूर्ण करत आता शिवाजी पुलाचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. परंतु आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या अटी मान्य करून पुन्हा काम सुरू करावे यासाठी मंजुरी घेतली होती परंतु त्यामध्ये एक एकर जमीन ही खाजगी होती त्याची नुकसान भरपाई पुरातत्व खात्याने द्यावी असा पत्रव्यवहार त्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु पुरातत्व खात्याने ही मागणी फेटाळली. आम्ही कती नुकसान भरपाई देण्यास बांधील नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी पुलाचे काम थांबवू नये, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे. तसेच ती एक एकर जागा ज्यांची आहे त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन शिवाजी पुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हा कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे. आणि खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे अशी भूमिका जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही लवकरात लवकर अंडरटेकिंग पत्र देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे. यामुळे आता शिवाजी पुलाचे काम लवकरच पूर्णत्वास येईल.
Leave a Reply