
कोल्हापूर : माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्यावतीने येथील शाहूब स्मारक मध्ये दि. 9 ते 11 मे दरम्यान ‘भारतीय समाजाच्या समस्या आणि लोकशाही’ या विषयावर सायं. 5.30 वाजता व्या‘यानमाला अयोजित केली असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष प्रा. ए बी कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ते म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र माणगाव परषिद घेतली होती. या परिषदेच्या शताब्दी निमित्त 9 ते 11 मे 2019 दरम्यान आयोजित केलेल्या व्या‘यानमालेतील 9 मे रोजी मुंबई विद्यापीठाचे माजी समाजसास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. जी. जोगदंड हे सामाजीक लोकशाही या विषयावर व्या‘यान देणार आहेत. 10 मे रोजी शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पोवार हे संसदिय लोकशाही या विषयावर व्या‘यान देणार आहेत. 11 मे रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे डॉ. नितीन तागडे, आर्थिक लोकशाही या विषयावर व्या‘यान देणार आहेत. यावेळी प्रा. सिध्दर्थ पद्माकर, प्रा. अशोक चोकाककर उपस्थित होते.
Leave a Reply