
कोल्हापूर: देशामध्ये दीवसे दीवस थैलेसिमीया, हिमोफीलीया, लुकेमिया, अप्लासिया,अॅनिमीया, या आजारांनी लहान मुलांना विळखा घालायला सुरु केली आहे. याची दखल घेत गेल्या काही वर्षा पासुन बर्वत पन्हाळकर यांनी समवेदना मेडीकल फौंडेशनची स्थापना करून या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी काम करायला सुरवात केली. तेंव्हा पासुन कोल्हापुरातील रुग्णांना एक आधार झाला.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात जाळे निर्माण करून सुविधापासुन वंचितासाठी प्रशासकीय पातळीवर पाठ पुरावा करण्यात येत आहे.रूग्णांना त्रास कमी व्हावे म्हणुन शहरात सीपीआरसह डीवाय पाटील, सिध्दिगीरी , सिद्धिविनायक अशा ४ हॉस्पीटलमध्ये थॅलेसिमीया डी केअर सेंटर सुरू आहेत. या रुगणांच्या मध्ये होत असलेली वाढ व त्यांना जगण्यासाठी लागणारे रक्त याची समाजाला माहीती कळणे गरजेचे होते म्हणुन फौंडेशनच्या पुढाकाराने अनेक हॉस्पीटल , बल्ड बँकेशी संवाद साधुन 8 मे थॅलेसिमीया जागतीक दीनपर समाजामध्ये जागृती रॅली काढण्याचे ठरले यावेळी सिपी आर हॉस्पीटल , सावीत्रीबाई फुले ,डीवाय पाटील, अॅस्टर अधार हॉस्पीटल, अर्पण, जीवन धारा, शाहु, वैभवलक्ष्मी, संजीवनी बल्ड बँक, यांनी सहभाग घेतला.
रॅलीची सुरवात सकाळी १०:३० कावळा नाका येथुन सुरवात झाली त्यावेळी महापौर सौ. सरिता मोरे, सिपीआर अधिष्ठाता अजीत लोकरे, प्रभारी सिव्हील सर्जन दीव्यानी, डीवाय पाटीलचे मेडीकल ऑफीसर बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवुन रॅलीस सुरवात झाली. थैलेसिमीया व रक्तादानच्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता.यावेळी डीवाय पाटीलच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर पदनाट्य केले.
ही रॅली कावळा नाका पासुन एसटी स्टँड, स्टेशन रोड, दसरा चौक येथे येवुन समाप्त झाली.
यावेळी फौडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर, डॉ. वरूण बाफना, डॉ. संदीप पाटील, डॉ. फिरके मॅडम, मुंबईचे डॉ. देव मिश्रा, प्रकाश गुंजरकर, माधव ढवळीकर, रमेश कांदेकर, रंजीत पाटील,फैजुल पन्हाळकर, सचिन वैरागे, मुस्ताक मुल्ला, अमीर पन्हाळकर, देशमुख आदी रूग्ण पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर फोर व्हीलर व मोटर सायकलांचा ताफा होता. अनेकांच्या हातामध्ये बॅनर होते त्यामुळे नागरीकांचे लक्ष या रॅली कडे जात होते .
Leave a Reply