
कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. याचे निमित्त आहे गेल्या सात वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” चे भव्य आयोजन “प्रायव्हेट हायस्कूल मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे दि. १०, ११, व १२ मे २०१९ रोजी करण्यात आले आले. या महोत्सवाकरिता प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. भगिनी महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ठ असलेल्या बचत गटांच्या स्टॉलची मांडणी, भव्य स्टेज, स्वागत कमानी आदीद्वारे भगिनी महोत्सवाची जय्यत तयारी करणेत आली आहे. महिलांच्या ध्येय निश्चिती करिता, विविध क्षेत्रामध्ये गगन भरारी घेण्याकरिता एक आदरणीय व्यक्तीचे अनुकरण त्यांनी करावे, याच प्रयत्नातून सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या अमूल्य कार्याचा आढावा घेत आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेल्या सिने, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि चळवळीतील पाच महिला भगिनींना“भगिनी पुरस्कार” ने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रु.११ हजार, मानपत्र, भगवा फेटा, शाल- श्रीफळ असे असते.भगिनी मंचतर्फे याआधी सन २०११ मध्ये समाजसेविका डॉ.सुधा कांकरिया, समाजसेविका अॅड. वर्षा देशपांडे, सिने अभिनेत्री स्मिता तळवलकर, गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत, वेट लिफ्टर स्नेहांकित वरुटे, सन २०१२ मध्ये जेष्ठ सिनेअभिनेत्री आशाताई काळे- नाईक, आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ, समाजसेविका सुनंदा पटवर्धन, समाजसेविका वैशाली पाटील, सन २०१३ मध्ये संपादिका जयश्री खाडिलकर, जेष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण- नाईक, धर्मप्रसारक सुनंदा बेहनजी, मातोश्री वृद्धाश्रम संचालिका वैशाली राजशेखर, क्रिकेटपटू अनुजा पाटील, सन २०१४ मध्ये जेष्ठ सिने अभिनेत्री सुलोचना चव्हाण- लाटकर, सिने अभिनेत्री उषा जाधव, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.साधना झाडबुके, बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, समाजसेविका स्मिता दीक्षित, सन २०१५ मध्ये जेष्ठ सिने अभिनेत्री लीलाताई गांधी, आंतरराष्ट्रीय नोकनयनपटू तारामती मतीवडे, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले, नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, कुस्तीपटू रेश्मा माने, सन २०१६ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या शालन शेळके, जेष्ठ सिने अभिनेत्री मधुताई कांबीकर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्म्रिती मानधना, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, हिंदू धर्म प्रसारक प्रतीक्षा कोरगावकर, सन २०१७ मध्ये जेष्ठ गायिका उत्तरा केळकर, सिने अभिनेत्री- नृत्यांगना माया जाधव, सावरपाडा एक्स्प्रेस ऑलिम्पियन कविता राऊत, आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, राष्ट्रीय निबंध स्पर्धा विजेती ऐश्वर्या सुतार, सन २०१८ मध्ये जेष्ठ अभिनेत्री मा.सरोज सुखटणकर, जेष्ठ सिने अभिनेत्री, दिग्दर्शिका मा. सुषमा शिरोमणि, समाजसेविका कु. नसीमादीदी हुरजूक, यशस्वी मराठी उद्योजिका सौ. अश्विनी दानिगोंड, आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हर डॉ. कु. ख़ुशी पौर्णिमा परमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावर्षीही भगिनी पुरस्कारासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या महिलांची निवड केली आहे.
Leave a Reply