डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटात राहिले सर्जिकल ब्लेड; वसीमचा मृत्यू

 

कोल्हापूर : अँपल सरस्वती हॉस्पिटलमधील शस्त्रकिये दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंट वसीम गजबर याच्या पोटात सर्जिकल ब्लेड राहिले. दोन दिवसानंतर तब्येत खालावली ही गोष्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असताना खुद्द वसीमच्या प्रसांगवधानामुळे ही बाब पुढे आले असता डॉक्टरांनी ही कबूल केली परंतु तोपर्यंत वसीमची प्राणज्योत मावळली.
10 मे रोजी सकाळी मृत गोष्टीत करण्यात आले. याबत नातेवाईकानी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत पुढील कार्यवाही व अधिक तपास पोलीस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, 6 मे रोजी वसीम गजबर याला अँपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते
सर्जरी नंतर 4 दिवसात प्रकृती ठीक असल्याचे सांगत सेमी आयसीयू मध्ये शिफ्ट केले व अजून उजव्या बाजूच्या लंग मध्ये एयर असून सर्जरी करावी लागेल म्हणून परवानगी घेतली. सर्वकाही मॅनेज करत असतानाच त्यावेळी पेशन्ट वसीम यांने पोटात सर्जिकल ब्लेड राहिले असल्याचे सांगितले. चौकशी अंती ब्लेंड राहिल्याचे एक्सरे मध्ये निदर्शनस आलेवर डॉक्टर यांनी मान्य केले. यानंतर प्रकृती सुधारणा झालेवर ब्लेड काढुया असे सांगण्यात आले परंतु या दरम्यान प्रकृती आणखीनच खालावली आणि 10 मे रोजी सकाळी वसीम याचा मृत्यू झाला. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. राजवर्धन घाटगे, डॉ. गिरीश हिरेगौडर, डॉ. अमृत नर्लेकर, डॉ. परमार व इतर कर्मचारीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या बाबत संबंधित डॉकटरांना विचारले असता ब्लेड राहिल्याने मृत्यू होत नसतो असे उत्तर दिले. रात्री उशिरापर्यंत कार्यवाही व तपासणी चालू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!