आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसदारांना एस.टी मध्ये नोकरी: चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर: आरक्षणासाठी ४२ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.या बलिदान दिलेल्यांच्या वारसदारांना सरकार एस. टी मध्ये नोकरी देणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. आरक्षण हे आमचे कर्तव्य होते ते आम्ही केले.हा आनंदोत्सव म्हणता येईल पण हेच आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयात टिकणे महत्वाचे आहे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले.
मी मुख्यमंत्री असल्यापासून मराठा सामाजाच्या आरक्षण मुद्दा ऐरणीवर आहे.काहींनी याला विरोध केला पण सुरुवात करून दिली असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
दिल्ली दरबारी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणारा मी पहिला खासदार आहे.असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र एकजूट झाल्यामुळे हा दिवस दिसत आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा हा विजय आहे. असे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी गौरव उद्गार काढले.
लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. शांततेने मोर्चे काढले.जे तरुण रस्त्यावर उतरले ते शिवरायांचे मावळेच होते असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
मराठ्यांच्या लढाईला यश आले आहे. ग्रामीण भागात तर आरक्षणाची गरज होती. कीत्येक वर्षे यापासून वंचित समजला दिलासा मिळाला असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
उच्च न्यायालयात आता आरक्षणासाठी हिरवा कंदील असला तरी सर्वोच्च न्यायालयात हे कसे टिकेल यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.यासाठी लागणारी सर्व गोष्टींची पूर्तता करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने,आमदार सत्यजित पाटील,अमल महाडिक,चंद्रदीप नरके,महापौर माधवी गवंडी,दिलीप पाटील,जयेश कदम,वसंतराव मुळीक,दिलीप देसाई यांच्यासह नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!