स्पीड न्यूज इफेक्ट ते भाजपचे फलक तात्काळ उतरवण्यात आले

 

स्पीड न्यूज इफेक्ट ते भाजपचे फलक तात्काळ उतरवण्यात आले
कोल्हापूर: मिरजकर तिकटी व उमा टॉकीज येथे भाजपमध्ये प्रवेश घेणे आहे व त्याबद्दलच्या नियम आणि अटी यांचे फलक लावण्यात आले होते. यामध्ये भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. ही बाब प्रथम स्पीड न्यूज ने लोकांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर अतिक्रमण विभागाने तात्काळ हे फलक उतरवले. स्पीड न्यूज ने ही बातमी टाकल्यानंतर या बातमीची शहरात जोरदार चर्चा रंगली.
या फलकावर भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी नियम व अटी ही लागू करण्यात आल्या होत्या.. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य,भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती,सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा
तसेच खाली टीप दिलेली होती. आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र पक्षात ऍडजस्ट करता येईल. यावरून लोकांना जे समजायचे ते समजत आहे.तसेच प्रवेशासाठी टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला होता.पण स्पीड न्यूजच्या या बातमीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!