
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे महसूलमंत्री व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार असून ‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी दिली.
पुणे,औरंगाबादनंतर कोल्हापूर येथील तिसरा मजला , एम्पायर टाँवर, दसरा चौक, येथे राज्य पत्रकार संघाचे कार्यालय कार्यरत होणार असून वृत्तवाहिनी व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना या कार्यालयामधून सर्व सुविधा प्राप्त होणार आहेत. कोणत्याही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या मुलाखती घेणे,तसेच प्रेस कॉन्फरन्स घेणेसाठी व सर्व वृत्तपत्रांसाठी हे मध्यवर्ती कार्यालय असून याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहनही संजय भोकरे यांनी केले आहे.
सांगली-मिरज रोडवरील ‘सेवासदन’ हॉस्पीटलचे संचालक डॉ.रविकांत पाटील यांनी राज्य पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांसाठी सवलतीची घोषणा केली असून बायपास, इंजोप्लास्टी आदिंसारख्या सर्जरींवर ५० टक्के सवलत देणार असल्याचे सांगितले.मोफत चेकअपचीही सर्वांना सवलत दिली असून ‘ओळखपत्रांचे’ वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.
Leave a Reply