News

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

July 8, 2022 0

नवी दिल्ली: राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पियूष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला. तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा, आज दिल्लीत शपथविधी झाला. भाजपचे खासदार पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्‍वराज महाडिक उपस्थित होते. शपथविधीनंतर महाडिक कुटुंबीयांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी बी न्यूज कॉर्नर फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच वेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता. 

News

विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

July 8, 2022 0

कागल :रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कागलमध्ये कागल, गडहिंग्लज – उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व्यापक […]

News

आमची शिवसेना हिच खरी शिवसेना: राजेश क्षीरसागर

July 8, 2022 0

कोल्हापूर :आमची शिवसेना हिच खरी शिवसेना आहे असे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होवून त्यांना पाठींबा दिला. ही आम्हा शिवसैनिकांची बंडखोरी नसून, शिवसेना संपवायला निघालेल्या […]

News

गोकुळ ग्रामीण पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील चुयेकर बिनविरोध 

July 7, 2022 0

कोल्‍हापूरः  कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत मा.शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर ‘ यांची व्हा.चेअरमनपदी आय.ए.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी नूतन संचालकांचा सत्कार गोकुळ […]

News

पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा : आमदार जयश्री जाधव

July 6, 2022 0

कोल्हापूर : पूराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज […]

Information

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी :जिल्हाधिकारी

July 1, 2022 0

कोल्हापूर : तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

Commercial

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीची अद्ययावत सेवा कोल्हापुरातही उपलब्ध

July 1, 2022 0

कोल्हापूर: नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी भारतातील अग्रगण्य प्रजनन क्षमता आणि आयव्हीएफ साखळींपैकी एक आहे. कोल्हापूर येथे नवे केंद्र सुरू करून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपला विस्तार केला आहे. शहराच्या मध्यभागी असलेले, कोल्हापूर केंद्र नोव्हाचे ५४ वे केंद्र […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी नंतर कोल्हापुरात शिवसैनिकांचा आनंदोत्सव

June 30, 2022 0

कोल्हापूर : गेले दहा दिवस सुरु असलेल्या राजकीय घडामोडी नंतर शिवसेनेचे नेते नाम.श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतली. या शपथविधी नंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी साखर – पेठे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष […]

News

गव्हर्मेंट सर्वांस बँकेकडून राजर्षी शाहू कृतज्ञ त्या पर्व ठेव योजनेचा शुभारंभ

June 30, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी:राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी ३ जुलै रोजी शाहू सांस्कतिक भवन, मार्केट यार्ड येथे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या […]

Information

नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर द्यावा :जिल्हाधिकारी राहूल रेखावार

June 28, 2022 0

कोल्हापूर: सारथीच्या अल्प काळातील कामांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या योजना तसेच सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेवून नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी यावेळी केले.छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व […]

1 18 19 20 21 22 417
error: Content is protected !!