लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा ‘कभी खुशी कभी गम’ला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने’कू’ वर खास पोस्ट लिहित एक अनोखा व्हीडिओही शेअर केला आहे.कभी खुशी कभी गम’ या सिनेमाने गेली 20 वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. महानायक अमिताभ बच्चन, काजोल, ह्रतिक रोशन, शाहरूख खान, जया बच्चन आणि करीना कपूरच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचं वेगवान आणि रंजक कथानक, गाणी, नृत्य यांनी हरेकाला खिळवून ठेवलं होतं. या सिनेमाला 20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त करण जोहरसह जगभरातल्या चाहत्यांना आनंद झाला आहे. करण जोहर मागच्या आठवडाभरापासून या बाबीचे सेलिब्रेशन करतो आहे. आज त्यांनी सगळ्या चाहत्यांसाठी एक खास नोट लिहिली आहे. करणने सगळ्या चाहत्यांसाठी एक स्पेशल नोट लिहिली आहे. सोबतच एक व्हीडिओही शेअर केलाय ज्यात शाहरूख, करीना, अमिताभससह इतरही स्टार्स दिसत आहेत. करण म्हणाला, की त्याला या सिनेमासाठी जे प्रेम मिळालं त्यासाठी थॅंक्यू हा शब्द पुरेसा नाही. व्हीडिओमध्ये करण हा फराह खान, शर्मिष्ठा रॉय, डिझायनर आणि सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद म्हणत आहेत. थ्रोबॅक व्हीडिओमध्ये करणचे दिवंगत वडील यश जोहर हेसुद्धा दिसत आहेत. करणने सगळ्यांना k3G ची 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने लिहिले आहे, ‘कभी खुशी कभी गम’साठी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम मिळते आहे. मी अक्षरश: निशब्द झालो आहे. धन्यवाद हा शब्दही कमी पडतो आहे. आज माझ्या काळजाचा हा छोटासा तुकडा तुमच्यासाठी…’ “https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″ =”https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″ target=” =”https://www.kooapp.com/koo/karanjohar/8ae22602-0eb4-4600-9be5-1c4b74071a72″ =”https://www.kooapp.com/profile/karanjohar”