मॅपअस’ मुळे बनणार कोल्हापूरची अपडेट आणि डीजीटल ओळख

 

image

कोल्हापूर : कोल्हापुरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर अशा भाऊ सॉफ्टवेअर या कंपनीने ‘मॅपअस’ नावाच्या गुगलसारखेच सर्च इंजिनची निर्मिती केली आहे. या सर्च इंजिनवर विविध क्षेत्रातील व्यक्ती, कंपनी, संस्था, बँका, दुकाने यांची संपूर्ण माहिती असणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला उपस्थित असलेल्या ठिकाणापासूनचा नकाशा तसेच हव्या असणाऱ्या सोयींची लिस्टही मोबाईलवर दिसणार आहे. ‘मॅपअस’ हे सर्व प्रकारच्या मोबाईलवर अॅप्लिकेशन स्वरुपात तसेच लॅपटॉप, कंप्युटर वर वेबसाईट स्वरुपात उपलब्ध होणार आहे.
‘मॅपअस’ या अॅप्लिकेशन व वेबसाईटवर कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण नकाशा दाखवण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील प्रत्येक विभागानुसार त्या त्या भागात उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी त्या त्या व्यक्तीना मोबाईलवर दिसणार आहे. अगदी पेट्रोल पंप, जवळ असणारे टायर पंचरवाले, एटीएम, ब्लड बँक अशा सर्व गोष्टी आवश्क माहिती व नंबर सह उपलब्ध असणार आहे. या ‘मॅपअस’ द्वारे आपली माहिती लोकांच्यापर्यत पोहोचवणे अगदी सोपे जाईल. त्याचसोबत लोकांना गरजेनुसार आवशक असणारे सर्व पर्याय येथे उपलब्ध असतील.  अशी माहिती कंपनीचे सर्वेसर्वां शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘मॅपअस’ वर रजिस्टरचे दोन प्रकार आहेत. एक संपूर्ण फ्री व दुसरे १ वर्षासाठी कमी शुल्कामध्ये संपूर्ण माहिती व्हिडीओसह देऊ शकता. ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणापासून जिथे जायचे आहे ते सर्व ठिकाणे नकाशादवारे येथे उपलब्ध आहे.
कोल्हापूरात पर्यटकांची संख्या वाढत आहे त्यांचा गरजेनुसार व्यवसामध्येहि वाढ होत आहे. यामुळे एकमेकांशी जोडून राहून आपला वेळ, श्रम, पैसा वाचवता येवून आवशक गरजा पूर्ण व्हावी या उद्देश ‘मॅपअस’चा आहे असे शरद पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!