
मुंबई : आज देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज सर्व मुस्लिम बांधव मशिदीत एकत्रित येऊन नमाज अदा केल्यानंतर सर्व जण एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ”ईद मुबारक” म्हणत सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र राज्यात भीषण पूर परिस्थिती पाहता पावसाने अनेक जिल्ह्याला चांगलेच झोडपल्याने अनेक जिल्ह्यातील गावे अजूनही पूरपरिस्थिती आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर,सातारा, सोलापूर,जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी अगदी साध्या पद्धतीने उत्साह साजरा करून पुरग्रस्ताना मदत देखील केली आहे.
Leave a Reply